आमदार अभिमन्यू पवार यांच्या 50व्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर
औसा मुख्तार मणियार
संपूर्ण राज्यात देशात कोरोना विषाणूने घातलेला थैमान, हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले.अशा परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या रक्ताचा तुटवडा लक्षात ठेवून आमदार अभिमन्यु पवार यांच्या वाढदिवसानिमित्त औसा येथील भाजपा तालुका युवा मोर्चाच्या वतीने औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यु पवार यांच्या 50व्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन औसा येथे 1 जुलै 2021 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता आमदार निवासच्या बाजूस बॅंक काॅलेनी मध्ये मुक्तेश्वर रोड येथे आयोजित करण्यात आले . औसा मतदार संघातील गावात रक्तदान शिबीर करण्यात आले .औसा येथे आमदार अभिमन्यु पवार यांच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटनप्रसंगी भाजपचे माजी नगराध्यक्ष किरण उटगे, तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, युवा नेते संतोष मुक्ता, गटनेते सुनील उटगे, मुक्तेश्वर वागदरे,मुन्ना वागदरे,आदिची उपस्थिती होती.हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिमाशंकर मिटकरी संघटक,मंकरंद रामपुरे सह सचिव औसा, गंगाधर विसापुरे औबीसी आघाडीचे अध्यक्ष, जगदीश चव्हाण सहसचिव औसा,लहुजी कांबळे शहराध्यक्ष ,औसा नारायण सांळुके संयोजक, विनोद नंजीले आदिनी परीश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.