आमदार मा. अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय भुतमूगळी तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न .......
दिनांक एक जुलै रोजी औसा विधानसभा मतदारसंघाचे कर्मधुरंदर लोकप्रिय आमदार मा .श्री.अभिमन्यूजी पवार साहेब यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून ग्रामपंचायत कार्यालय भुतमूगळीच्या वतीने साजरा करण्यात आला.
हा सामाजिक उपक्रम सरपंच मा.मधुकरराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी भारतीय जनता पार्टी भुतमुगळी बूथ प्रमुख मा. श्री.दत्तात्रय ऊसनाळे, हरिश्चंद्र रामतीर्थ, कमलाकर माळी, अशोक सुरवसे, दिलीप भालके, प्रताप सोळुंके, गोविंद सावंत, तसेच गावातील इतर सर्व प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले व आमदार साहेबांना उदंड आयुष्याच्या अनंत कोटी शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.