रामनाथ विद्यालयांमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात नियोजन बैठक संपन्न

 रामनाथ विद्यालयांमध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भात नियोजन बैठक संपन्न.





औसा प्रतिनिधी

 आलमला:--- श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रामपंचायत स्तरावरील आठवी ते बारावीचे नियमित वर्ग सुरू करण्यासाठी दिनांक 9जुलै 2021रोजी ठीक 11 वाजता विद्यालयाच्या सभागृहात सरपंच श्री कैलास निलंगेकर आलमला यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली .यावेळी ग्रामपंचायत स्तरावरील तलाठी सोनवते बी.जी. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पाटील एस. एस . ग्रामसेवक राठोड एस. एच. केंद्रप्रमुख शारवाले एम.ए. साहेब तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. बिराजदार उषा, ग्रामपंचायत सदस्य अंबुलगे गुरुनाथ, संस्थेचे सहसचिव कापसे प्रभाकर, मुख्याध्यापिका सौ .अनिता पाटील यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली. या बैठकीत मुलांनी शाळेत येताना घ्यावयाची काळजी या विषयावर सर्वांनी चर्चा करून दिनांक 15 जुलै पासून आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले या बैठकीत प्रथम विद्यालयाच्या वतीने सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव प्रभाकर कापसे  ,सरपंच निलंगेकर कैलास व केंद्रप्रमुख श्री शारवाले एम.ए. साहेब यांनी शाळा सुरु करण्या संदर्भात विस्तृत असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी .सी .पाटील यांनी केले तर आभार शरण धाराशिवे यांनी मांडले. कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री आवटे ए.आय.सर्व शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या