*सोलापूर - उस्मानाबाद रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रस्ताव देण्याचे निर्देश*
दि. 9 - उस्मानाबाद -
जिल्हाधिकारी कार्यालयात उस्मानाबाद - तुळजापूर - सोलापूर रेल्वे लाईन भूसंपादन सुंदर बाद खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची, महसूल विभाग व उस्मानाबाद- सोलापूर जिल्ह्याचे भूसंपादन अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत सोलापूर - उस्मानाबाद या रेल्वे मार्गात उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यातील 42 गावे येतात तसेच हा रेल्वे मार्ग 80 कि. मी. लांबीचा असून पहिल्या टप्प्यात 0 ते 20 की. मी. रेल्वे लाईन चा रेल्वे विभागाच्या डिमार्केशन करणार एजन्सीने सविस्तर प्रस्ताव मोजणी विभागास देण्यात यावा
यातील 60 ते 80 कि. मी. चा भूसंपादन प्रस्ताव जुलै, 0 ते 20 कि. मी. चा भूसंपादन प्रस्ताव ऑगस्ट, 60 ते 40 कि. मी. चा भूसंपादन प्रस्ताव सप्टेंबर, 40 ते 20 कि. मी. चा भूसंपादन प्रस्ताव ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत रेल्वे विभागाने महसूल विभाग प्रस्ताव देण्यात यावे, असे निर्देश संबंधित अधिकारी वर्गास आमदार ओमराजे निंबाळकर यांनी दिले.
सदरील बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हाधिकारी भूसंपादन समन्वय सोलापूर अरुण गायकवाड, उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद डॉक्टर योगेश खरमाटे, सहाय्यक कार्यकारी अभियंता मध्य रेल्वे सोलापूर राजनारायण भगवान दिन, उपमुख्य अभियंता पंकज धावारे, पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, माजी उपसरपंच कसबे तडवळे तुलसीदास जमाले, रेल्वे विभाग, महसूल विभाग, भुमी अभिलेख इत्यादी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.