मुक्‍त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरु ! - जाणून घ्या सविस्तर*

 उस्मानाबाद प्रतिनिधी, अल्ताफ शेख


*मुक्‍त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरु ! -  जाणून घ्या सविस्तर*





 यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त - शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी काल १ जुलै पासून, प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली आहे 


 त्यानुसार या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत - राज्‍यभरातील विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या पात्रतेनुसार विविध दहा विद्याशाखांच्‍या प्रमाणपत्र, पदवी, पदविका आणि पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येईल


या प्रवेशासाठी ३१ ऑगस्‍टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरणे आवश्‍यक आहे, तसेच यंदा क्‍युआरकोड स्‍कॅन करून सुद्धा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्‍ध करून दिली आहे -  


 *मुक्‍त विद्यापीठाची प्रवेशप्रक्रिया* - सुरु झाली हि माहिती, विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे -

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या