प्रा सुधीर पोतदार यांची ओबीसी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड

 प्रा सुधीर पोतदार यांची ओबीसी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवड 






औसा प्रतिनिधी 


औसा तालुक्याचे भूमिपुत्र तथा ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा सुधीर पोतदार यांची महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दि 8 जुलै रोजी ओबीसी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदासराव माळी यांनी लातूर येथील काँग्रेस भवन येथील आयोजित  कार्यक्रमात त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा सुधीर पोतदार यांच्या रूपाने औसा तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची संघटन बांधणी करण्यासाठी आणि ओबीसी समाजाचे सामाजिक, शैक्षणिक ,आर्थिक ,मागासलेपण दूर करण्यासाठी तालुक्याचे ओबीसी नेते प्रा सुधीर पोतदार यांच्या अनुभवाचा लाभ काँग्रेस पक्षाला व्हावा. ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असणारे, प्रा सुधीर पोतदार यांच्या कुशाग्र बुद्धी, संघटन कौशल्य शिस्तबद्धता, उत्तम नियोजन याचा पक्षाला लाभ होणार आहेत.प्रा सुधीर पोतदार यांच्या रूपाने ओबीसी काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला निश्चितच उभारी मिळेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष भानुदासराव माळी यांनी नियुक्तीपत्र देताना व्यक्त केला.यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजीराव सूळ ,ओबीसी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील ,श्री भगवानराव कोळेकर ,हरिभाऊ गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रा सुधीर पोतदार यांची ओबीसी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल काँग्रेस पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य   उटगे , औसा तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी शहराध्यक्ष शेख शकील औसा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत राचट्टे, श्याम भोसले ,पंचायत समिती सदस्य नवनाथ राऊत माजी सदस्य माजी सदस्य बसवराज धाराशिव हे पंचायत समितीचा सभापती सौ अर्चना गायकवाड, उपसभापती राजश्री काळे व सदस्य त्रिवेणी काळे ,मंगल कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, काँग्रेस पक्षाचे औसा तालुका माध्यम मिडीया प्रमुख विठ्ठल पांचाळ यांनी अभिनंदन केले असून सर्वच त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या