निराधारांच्या पगारीसाठी अधारकार्डावरील वय तसेच मेडिकल ची सक्ती करु नये:जय महाराष्ट्र सेनेची मागणी
औसा मुख्तार मणियार
औसा : निराधार पगारीच्या योजनेसाठी लातूर तहसिल प्रमाणे मेडिकल प्रमाणपत्र घेऊ नये व आधार कार्ड वरील वय गृहीत धरावे या मागणीसाठी दि.8 जुलै गुरुवार रोजी जय महाराष्ट्र सेनेच्या वतीने औसा तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे.या निवेदनामध्ये असे नमूद केले आहे.लातुर जिल्ह्यात बरेच निराधार आहेत त्यात कोरोना ने आणखीन जास्त भर घातलेली आहे. या योजना मुख्यतः तहसील मार्फत चालतात ज्यामध्ये संजय गांधी/श्रावण बाळ /इंदिरा गांधी वृध्दापकाळ /इंदिरा गांधी विधवा व या सारख्या अनेक योजना आहेत या योजनेत सहभागी होण्यासाठी तालुक्यातील इतर तहसील कार्यालयात मेडिकल प्रमाणपत्र घेतले जात नाही मात्र याला औसा तहसील अपवाद आहे. कारण येथे या सर्व प्रमाणपत्र घेतल्याशिवाय अर्ज स्विकारला जात नाही. पुढे निवेदनात म्हंटले आहे की इतर तहसील प्रमाणे आधार कार्डावरील वय ग्राह्य धरण्यात यावे व त्याचा निराधाराचा फार्म स्विकारावा अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा जय महाराष्ट्र सेना तर्फे देण्यात आलेला आहे.
या निवेदनावर राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.औसेकर, सुदर्शन कुरूद,बाळू साठे, नंदु सरवदे,अमर बिसेन आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.