साडेपाच हजार शेतकऱ्यांच्या ५० हजारांच्या अनुदानाकडे नजरा*

 *साडेपाच हजार शेतकऱ्यांच्या ५० हजारांच्या अनुदानाकडे नजरा*





दि. - 23 - उस्मानाबाद -


*परंडा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने आपल्या संस्थेच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांनी कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरले आहेत*


*हे पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नयेत, यासाठी M संस्थेचे चेअरमन अनिल शिंदे, संचालक मुजीब काझी यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या अनुषंगाने ठराव घेऊन तो राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविला आहे.*


नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान जाहीर केले आहे. या योजनेमध्ये

एकट्या परंडा तालुक्यातील सुमारे साडेपाच हजार शेतकरी पात्र ठरले. स्थानिक प्रशासनाकडून हा अहवाल शासनाला दिला. परंतु, अनेक महिन्यांचा कालावधी लोटूनही अनुदानातील छदामही मिळालेला नाही. सरकारच्या या धोरणाविरुद्ध आता पात्र शेतकऱ्यांतून तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.


महाविकास आघाडीच्या सरकारने सत्तेवर येताच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. त्यानुसार सप्टेंबर २०१९ पर्यत थकित असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे नियमित कर्ज भरने हा गुन्हा झाला का? अशी भावना या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत मदत सरकारने जाहीर करावी, या मागणीसाठी शेतकरी संघटना पुढे आल्या होत्या. मागणीने जोर धरल्यानंतर सरकारने अशा शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार तालुक्यातील सुमारे साडेपाच हजार शेतकरी अनुदानाच्या लाभासाठी पात्र ठरले होते. मात्र, थकबाकीदार शेतकऱ्यांचे सातबारे कोरे झाले तरी नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर मात्र 50000रुपयांपर्यंतच्या अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून आता तीव्र प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.



Web Blog👆

*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170

Mail :Laturreporter2012@gmail. com

Web :www.laturreporter.in

 *उस्मानाबाद* * प्रतिनिधी **महेबुब सय्यद*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या