कोरोना मध्ये विधवा झालेल्या महिलांचे पुनर्वसन करा: कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीची मागणी

 कोरोना मध्ये विधवा झालेल्या महिलांचे पुनर्वसन करा: कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीची मागणी










औसा मुखतार मणियार

औसा: लातूर जिल्ह्यातील कोरोना मध्ये विधवा झालेल्या महिलांना पुनर्वसन करा या मागणीचे निवेदन दिनांक 23 जुलै 2021 शुक्रवार रोजी औसा तहसीलदार मार्फत एकल कोरोना महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र च्या वतीने लातूर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात सविस्तर माहिती अशी कोरोनात विधवा व निराधार झालेल्या महिलांची आकडेवारी जाहीर करावी व यात 50 वर्षाच्या आतील विधवा झालेल्या महिलांची संख्या नक्की करावी. जिल्ह्याबाहेर झालेले मृत्यू व घरी झालेले मृत्यू अशा सर्व प्रकारच्या विधवांचा यात समावेश करावा या माहितीची सामाजिक, आर्थिक स्थिती व समस्या लक्षात येण्यासाठी अंगणवाडी सेविका मार्फत या महिलांचे सर्वेक्षण 8 दिवसांच्या आत करुन त्यांच्या गरजा नक्की पूर्ण करण्यात याव्यात. यासाठी एक कुटुंब सर्वेक्षण फार्म तयार करावा व पूर्ण जिल्हयात तशी माहिती भरुन घ्यावी.जेकी स्वंयसेवी संस्था या महिलांच्या पुनर्वसनासाठी मदतीचे काम करीत आहेत यांना तालुकानिहाय मृत्यू झालेल्यांचे याद्या.नांव ,गांव व पत्यासह उपलब्ध करून द्याव्यात.लातूर जिल्ह्यातील अशा महिल्यांच्या उदरनिर्वाह व सन्मानाने जगण्याचा प्रश्न गंभीर असून आपण जिल्हाधिकारी म्हणून या प्रश्नावर तातडीने पुढाकार घ्यावा.अशी मागणी एकल कोरोना महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्रच्या वतीने औसा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.यावेळी एकल कोरोना महिला पुनर्वसन समितीचे अल्का भिवाजी लोखंडे,मोहीनी मारुती कांबळे,आदि महिला उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या