*काल रात्रीची गोष्ट. आहे कैलास बाळासाहेब घाडगे-पाटील आमदार उस्मानाबाद,आपला मुंबई दौरा आटोपून उस्मानाबाद ला परत येत होते*. अल्ताफ शेख, प्रतिनिधी/ उस्मानाबाद आमदार साहेब याना ,रात्री 3 वाजण्याच्या सुमारास फोन आला की तेरखेडा जवळ अपघात झाला असून 4 व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला असून एक जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्वजण नाशिक येथील मालेगाव येथिल असल्याचे सांगण्यात आले. लागलीच आमदार महोदयांनी तेरखेडा येथील सेनेच्या पंचायत समिती सभापती श्री. बाबा घोलप यांना फोन करून अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचायला सांगितले. अन तिथे उपस्थित असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल श्री. मस्के यांना फोन करून संबंधित व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे सांगितले. त्यासाठी रुग्णवाहिका ही त्यांनी फोन करून लागलीच पाठवून दिली. उपचारासाठी ती व्यक्ती रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी आमदार साहेब स्वतः सामान्य रुग्णालयात येऊन डॉक्टरांसह रुग्णवाहिकेची वाट पाहत थांबले होते. रुग्णवाहिका आल्यानंतर स्वतः त्यांनी त्या व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
व्यक्तीला मार जास्त लागला असल्याने तो गंभीर झाला होता त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याच्या बरगड्या तुटल्याचे लक्षात आले. प्राथमिक उपचार करून सदरील व्यक्तीला लागलीच सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्याचे आदेश दिले.
स्वखर्चाने आमदार साहेबानी त्या व्यक्तीला पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवून त्या रुग्णालयास याबाबत बोलणं करून लवकरात लवक हबर उपचार चालू करण्यासाठी सांगितले.
आज सकाळी जागीच मृत्यू झालेल्या 4 व्यक्तींचे मृतदेह स्वखर्चाने मालेगाव ला पाठवून देण्याची व्यवस्था केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.