समता फाऊंडेशनने राबविली आदर्श कार्याची चुणूक ३० हजार नागरिकांना लस

 

समता फाऊंडेशनने राबविली आदर्श कार्याची चुणूक
३० हजार नागरिकांना लस






लातूर (प्रतिनिधी)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहनास प्रतिसाद देऊन समता फाऊंडेशनने १५ जुन पासून रिसोड शहरात लस उत्सव सुरु केला आहे. या लस उत्सवाचा लाभ १४ हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. येत्या १० दिवसात ३० हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल.
प्रसिद्ध उद्योगपती पुरुषोत्तम अग्रवाल यांनी समता फाऊंडेशन ही संस्था स्थापन केली. समाजकार्य हाच या संस्थेचा उद्देश राहिलेला आहे. आतापर्यंत संस्थेने विविध उपक्रम राबविले आहेत.
वाशिम जिल्हा परिषद, रिसोड नगर परिषद, तालुका, पत्रकार संघ, ग्रामीण पत्रकार संघ, तहसीलदार, सीटीकेअर हॉस्पिटल, शाळा, कॉलेज, पतसंस्था अशा विविध संस्थांचे व नागरिकांचे सहकार्य लाभल्यामुळे हा लस उत्सव यशस्वी होत आहे. अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे मागील अनेक वर्षात संस्थेने विविध प्रकारचे सामाजिक कार्य केलेले आहे. कैद्यांना प्रशिक्षण, मुलांना संगणक प्रशिक्षण, महिलांना कौशल्य व व्यावसायिक शिक्षण, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फॅमिली प्लॅनिंग शस्त्रक्रिया, आरोग्य केंद्रांना मदत असे विविध प्रकारचे सामाजिक कार्य संस्थेकडून सुरु आहे. या कार्याची दखल राज्याने घेतली आहे. या कार्यांची प्रशंसा होत आहे.
समता फाऊंडेशनकडून भव्य लसीकरण उत्सव !
 लातूर (प्रतिनिधी) -  कोविड संकट काळात जनतेला मोठी मदत करणार्या समता फाऊंडेशनने १५ जूनपासून रिसोड शहरात भव्य लस उत्सवाचे आयोजन केले आहे. आतापर्यंत या लस उत्सवात २० हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. येत्या १० दिवसात ३० हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते.
प्रसिद्ध उद्योगपती श्री. पुरुषोत्तम अग्रवाल यांनी समता फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या संस्थेने आतापर्यंत जे सामाजिक कार्य केले ते खरोखरच उल्लेखनीय कार्य आहे. या कार्याला तोड नाही, अशी चर्चा जनतेत सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस मोहिमेची घोषणा केली. मोदींच्या आवाहनास प्रतिसाद देऊन पुरुषोत्त अग्रवाल यांनी लगेचच भव्य लस उत्सवाचे आयोजन केलेले आहे. आतापर्यंत या लस उत्सवात १४ हजारांना लस दिली गेली आहे.
या संस्थेने विविध कार्यक्रम राबविले आहेत. या लस उत्सवास रिसोड नगर परिषद, वाशिम जिल्हा परिषद, तहसीलदार, तालुका पत्रकार संघ, ग्रामीण पत्रकार संघ, सिटी केअर हॉस्पिटल यांनी सहकार्य केले आहे. या लस उत्सावाची जोरदार चर्चा सुरु आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या