आसरा रेल्वे पुलाचे रुंदीकरण तात्काळ करा अन्यथा रस्ता रोको आंदोलन .

 आसरा रेल्वे पुलाचे रुंदीकरण  तात्काळ करा  अन्यथा रस्ता रोको आंदोलन .





  सोलापूर प्रतिनिधी  संभाजी ब्रिगेड सोलापूरच्या वतीने  जुळे सोलापूर येथिल आसरा रेल्वे ब्रिज रुंदीकरण   करण्यासाठी  होणाऱ्या दिरंगाईबाबत  सोलापूर महानगरपालिका उपायुक्त पाटील  यांना निवेदन देऊन सदरचे काम तात्काळ सुरुवात नाही झाल्यास  आसरा रेल्वे पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा  संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष  श्याम कदम यांनी दिला आहे

 जुळे सोलापूर ला जाण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा रस्ता असून तो फारच अरुंद आहे त्यामुळे या पुलावर वारंवार वाहतुकीची कोंडी होते तसेच याठिकाणी छोटे मोठे अपघात होऊन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे या गंभीर विषयाबाबत  माननीय खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी महापौर सोलापूर महानगरपालिका माननीय जिल्हाधिकारी सोलापूर तसेच माननीय रेल्वे प्रबंधक सोलापूर तसेच आपणाकडे वारंवार या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करण्यात  आला आहे यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा सोलापूर महानगरपालिका प्रशासन व सोलापूर रेल्वे प्रशासन हे एकमेकाकडे टोलवाटोलवी करून चालढकल करीत आहेत  त्यामुळे महापालिका प्रशासन व रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने येत्या आठ दिवसात आसरा पुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल कायदा व सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी सोलापूर महानगर पालिका प्रशासनावर राहील  असा इशारा संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला आहे.

 यावेळी संभाजी ब्रिगेडचे सिताराम बाबर कार्याध्यक्ष अरविंद शेळके संघटक सुलेमान पिरजादे मधून सचिव गजानंद शिंदे प्रसिद्धीप्रमुख मल्लिनाथ  अकसर इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या