औशात भाजपचे निदर्शने, भास्कर जाधव यांचा पुतळ्याचे दहन..

 


 औशात भाजपचे निदर्शने, भास्कर जाधव यांचा पुतळ्याचे दहन... 






औसा -प्रतिनिधी मुख़्तार मणियार 

 विधीमंडळ अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केल्याने याचे तीव्र पडसाद औसा विधानसभा मतदारसंघात पडले आहेत.दि.६ जुलै रोजी औसा तहसील कार्यालयासमोर या निलंबना विरोधात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीन तास ठिय्या आंदोलन करीत घोषणा बाजी केली तसेच भास्कर जाधव यांच्या पुतळ्याचे दहन करीत.हे निलंबन मागे घेण्याचे निवेदन औसा तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे राज्यपाल यांना देण्यात आले. 







                             औसा तहसील कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात भाजप पदाधिकाऱ्यांनी या १२ आमदारांच्या निलंबना विरोधात घोषणाबाजी करीत ठाकरे सरकारचा जाहीर निषेध केला.तसेच औसा तहसील कार्यालयासमोर भास्कर जाधव विरोधात घोषणाबाजी करीत भास्कर जाधव यांचा पुतळा दहन करण्यात आला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, शहराध्यक्ष लहू कांबळे,अॅड. मुक्तेश्वर वाघधरे,अॅड. अरविंद कुलकर्णी, भाजपचे गटनेते सुनील उटगे,संतोषअप्पा मुक्ता, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भिमाशंकर राचट्टे, काकासाहेब मोरे, भिमाशंकर मिटकरी, संजय कुलकर्णी, दिपक चाबुकस्वार, डॉ. शुभराजे भोसले, तुराब देशमुख, नगरसेवक गोपाळ धानूरे, विकास नरहरे, महेश पाटील, भागवत कांबळे, गणेश कोळपाक, गोविंद मुडबे,जनार्दन कास्ते, नवनाथ मुसके,शिव मुरगे, विजय भुजबळ,शाहूराज डोके , ज्योती हालकुडे, कल्पना डांंगे,अॅड. मोहिनी पाठक, प्रा. सोनाली गुळबिले, माधुरी पाटील, सुनीता सुर्यवंशी, आश्विनी घाडगे, जयपाल भोसले, पृथ्वीराज पाटील, सचिन कांबळे, पप्पूभाई शेख, बालाजी चामे, सचिन अनसरवाडे, नागनाथ गंधुरे, सागर अपुणे, गोविंद सुर्यवंशी, कंटीअण्णा मुळे, दत्ता भोसले, आदील शेख, जगदिश चव्हाण, सचिन गरुड, मारुती टिपे आदीसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते... 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या