औसा शहरात कोकण व पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्तांसाठी मदत फेरीला उदंड प्रतिसाद

 औसा शहरात कोकण व पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्तांसाठी मदत फेरीला उदंड प्रतिसाद












औसा मुख्तार मणियार

औसा शहरात काँग्रेस पक्ष औसा, युवक काँग्रेस व विलासराव देशमुख युवा मंच च्या वतीने आज दिनांक 28 जुलै 2021 बुधवार रोजी किल्ला मैदान येथून ते हाश्मी चौक पर्यंत कोकण व कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदत फेरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री अमित देशमुख, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्री शैल्य उटगे यांच्या सूचनेनुसार व ही मदत निधी संकलन फेरी प्राध्यापक सुधीर पोतदार औसा तालुका विधानसभा पक्ष निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली.यावेळी या मदत फेरीमध्ये 51 हजार रुपयांचा निधी संकलन करण्यात आला. यावेळी या मदत निधी संकलन फेरीमध्ये काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी, शहराध्यक्ष शकील भाई शेख, युवक काँग्रेसचे हनुमंत भैय्या राचट्टे, विलासराव देशमुख युवा मंच चे तालुकाध्यक्ष रवी पाटील, शहराध्यक्ष खुंदमिर मुल्ला, नगरसेवक अंगद कांबळे, जयराज कसबे,अॅड शाहनवाज पटेल, बजरंग बाजुळगे, राजेंद्र बनसोडे, ओबीसी सेलचे भागवत माळी, गणेश कसबे,खाजा शेख,सुमित लोंढे, जयराज ठाकुर,नियामत लोहारे, हमीद सय्यद, हमीद सर,संपत गायकवाड, सरफराज पठाण,मुज्जमील शेख,दिपक कांबळे, सिकंदर शेख,मिनाहज शेख,हाजी शेख,अल्ताफ सय्यद, ओमप्रकाश गरड,उमेर सय्यद,शहेबाज शेख, नंदकुमार सरवदे आदिनी या मदत फेरीला सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या