जमियत उलेमा- ए- हिंद व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड परंडा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने* पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा

 *जमियत उलेमा- ए- हिंद व मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड परंडा तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने*

 पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा या अनुषंगाने आज परंडा शहरांमध्ये निधी संकलनासाठी रॅली काढण्यात आली मदतीचा हात म्हणून लोकांनी रोख रक्कम, किरणाचे किट, कपडे ,खारी टोस्ट ,रगई,इत्यादी *चार लक्ष रूपयाच्या* जीवनावश्यक वस्तू देऊ केल्या.

 यावेळी *जमियत उलेमा-ए-हिंद* चे तालुकाध्यक्ष मौलाना जफर काझी, परंडा शहराध्यक्ष मुर्तूजा खान पठाण, नगरसेवक इरफान शेख, हाफिजोद्दीन करपुडे, सेक्रेटरी रियास शिकलकर, *मराठा सेवा संघाचे* देवानंद टकले, तालुकाध्यक्ष गोरख मोरजकर, उपाध्यक्ष विशाल पवार *संभाजी ब्रिगेडचे* जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे, मलिक सय्यद तालुकाध्यक्ष समाधान खुळे, उपाध्यक्ष सुहास ठोंगे, माजी नगराध्यक्ष  बाशाभाई शहाबर्फीवाले ,नासिर शेख, नुसरत करपुडे,मौलाना बिलाल, राजू शेख, गप्पार शेख ,कलीम शिकलकर, साबीर शेख, रहीम करपुडे, साबेर पल्ला, जमीर शिकलकर, सलीम हुन्नुरे, अमोल शिरसागर, फारुक शेख, मुन्ना शेख, *जिजाऊ ब्रिगेडच्या* जिल्हा उपाध्यक्ष आशाताई मोरजकर, तालुकाध्यक्षा अर्चना भांडवलकर, उपाध्यक्षा अपेक्षा पाटील ,कार्याध्यक्षा मनीष जगताप, सुरेखा करळे, प्रगती खैरे उपस्थित होत्या . #माणुसकीसाठी_आम्ही_सर्व_एकत्र 🙏

#सामाजिक_एकतेचे_एक_नवीन_आदर्शरूप

आज परंडा जि.उस्मानाबाद येथे कोकण येथील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी माणुसकीच्या सेवेकरिता #जमियत_ए_उलेमा_हिंद सोबत #संभाजी_ब्रिगेड व #मराठा_सेवा_संघ तसेच #जिजाऊ_ब्रिगेड या विविध धार्मिय सामाजिक संघटनांनी अभूतपूर्व रित्या एकत्र येत सामाजिक एकतेचे एक नवीन आदर्श रूप सादर केले.

या सर्व संघटनांनी अभूतपूर्व एकत्ररित्या येत शहरामध्ये मदतफेरी (रॅली) चे आयोजन करून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी संकलित केला.  माणुसकीच्या सेवेसाठी एकत्रितपणे निघालेल्या या रॅली चे शहरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले सोबत भरघोस मदत ही केली. तब्बल 3 लाख रुपये रोख रक्कम सोबत किराणा समान,कपडे, बेडशीट्स गरम शाली सोबत इतर संसार उपयोगी साहित्य दिले.

शहरात निघालेल्या या अभूतपूर्व मदत रॅली चे विविध स्तरातून प्रचंड कौतुक करण्यात आले.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या