सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाची पाहणी सुरू!

 सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाची पाहणी सुरू!





*अल्ताफ शेख प्रतिनिधी । उस्मानाबाद*,


तुळजापूर शहर रेल्वेशी जोडले जावे यासाठी अनेक दशकांपासून प्रयत्न सुरू होते. अनेक संघर्ष समित्यांनी आंदोलने देखील केली होती. लोकप्रतिनिधींनी सुद्धा प्रयत्न करून पाहिले. पण तुळजापूर रेल्वे काही केल्या सत्यात येत नव्हती. दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने या मार्गाला तत्वतः मान्यता दिली. त्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली असल्याचे दिसून येत आहे. दि.३० जुलै रोजी उस्मानाबाद तालुक्यातील बावी (का) येथील काही शेतकऱ्यांच्या शेतात खुणा करून रेल्वे प्रशासनाचे अधिकारी परत गेले आहेत. विशेष म्हणजे महसूल प्रशासनास देखील याची माहिती नसल्याचे दिसून येत आहे. 


छत्रपती संभाजीराजे खासदार बनून दिल्लीत गेल्यानंतर त्यांनी स्वतःचे वजन वापरण्यास सुरुवात केली. छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी असल्याने त्यांनी कर्तव्य म्हणून हे कार्य नेटाने पुढे नेले. योगा योगाने दिल्लीमध्ये त्यांचे सचिव योगेश केदार हे सुद्धा तुळजापूर तालुक्यातीलच सलगरा दिवटी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी स्वतः अनेक वेळा मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्यास प्रयत्न केले. योगेश केदार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येत गेले. ते सद्ध्या भारतीय रेल्वेच्या सोलापूर विभागीय समितीवर सदस्य आहेत. त्यामुळे सद्ध्या अधिक वेगाने पाठपुरावा सुरू आहे.


तुळजापूर हे शहर भारतीय रेल्वेच्या नकाशावर यावे यासाठी अनेक पिढ्यांनी संघर्ष केला. त्या रस्त्यावरच्या लढाईत सहभागी होता आले नाही. परंतु केदार यांना छत्रपती संभाजी राजेंनी दिल्लीमध्ये त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली त्या संधीचा उपयोग करून रेल्वे चा हा प्रकल्प मंजूर करून घेण्यात यश आले आहे. त्याबाबत केंद्र सरकारचे सुद्धा आभार मानले पाहिजेत. केदार यांची चिकाटी बघूनच राजेंनी रेल्वे समितीवर सदस्य म्हणून शिफारस केली. यापुढेही हा प्रकल्प पूर्ण मार्गी लागेपर्यंत पाठपुरावा अखंड चालूच ठेवणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या