शिक्षण व संशोधनाला महत्त्व देऊन काम केल्यास त्या देशाची चौफेर प्रगती होते. - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

 

  शिक्षण व संशोधनाला महत्त्व देऊन काम केल्यास त्या देशाची चौफेर प्रगती होते.
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर










लातूर दि.31/07/2021
सामाजिक जीवनामध्ये शिक्षणाला मोठे महत्त्व प्राप्‍त झाले आहे. ब्रिटन, चीन, अमेरिका या देशामध्ये
संशोनाला महत्त्व दिले जाते. सध्याचे युग हे बौद्धिक संपदेचे युग आहे. त्यामुळे त्या बौद्धिक संपदेच्या जोरावर आपणांस नवनवीन संशोधन करता येते. आपल्याकडे जगाच्या तुलनेत भारतातील तरूण हे अधिक हुशार आहेत. त्याला संशोधनाची जोड नसल्यामुळे बरेच तरूण बेकारही आहेत.परंतु स्पर्धेच्या युगात शिक्षण व संशोधनाला महत्त्व देवून काम केल्यास त्या-त्या देशाची चौफेर प्रगती होते. असे प्रतिपादन भाजपा नेते तथा जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर केले.
यावेळी ते जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कूलच्या सभागृहात गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचायर्र् डॉ.सच्चिदानंद जोशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, संंस्थेचे समन्वयक निळकंठराव पवार, समन्वयक विनोद जाधव, उपप्राचार्य डॉ.आशा जोशी, प्राचार्य मनोज गायकवाड, प्राचार्य पांचाळ, मुख्याध्यापिका अरूणा कांदे, इस्टेट मॅनेजर चंद्रशेखर पाटील, संपत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, देशामध्ये शिक्षणासाठी 94 हजार कोटींची तरतूद  करण्यात आली आहे. इतर देशाच्या तुलनेत आपला जी.डी.पी.3 ट्रिलिनय डॉलर, चीन 11 ट्रिलियन डॉलर,  अमेरिका 22 ट्रिलियन डॉलर आहे. यामध्ये शिक्षणावर सर्वाधिक खर्च अमेरिकेने केलेला आहे. तर दिल्‍ली सरकारने 33 टक्के तरतूद शिक्षणावर केलेली आहे. तेथील शिक्षणपद्धती अतिशय उत्कृष्ठ आहे. त्या शिक्षणपध्दतीचा मी जवळून अभ्यास केला. हावर्ड विद्यापीठालाही भेट दिली. त्यामुळे केंद्र शासनाने देशातील शिक्षणपध्दतीमध्ये सुधारणा करण्यासाठी नवीन सीबीसीएस शिक्षणपध्दती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली. शिक्षणातील सुधारणेसाठी त्या नवीन शिक्षणपध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. आपल्या संस्थेनेही मानवता हाच धर्म व टॅलेंट हीच जात समजून गुणवत्ता जोपासण्याचे काम सुरू ठेवलेले आहे. जगामध्ये  गरीब आणि श्रीमंत दोनच जाती आहेत.या दोन गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी ई.डब्ल्यु.एस.चा कोटा वाढविण्याची गरज असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
प्रारंभी स्वामी विवेकांनद आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. तसेच मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत विश्‍वजीत पाटील, रामानंद शिंदे, जगदीश पवार, रूचा शेळके, रोहन कदम या विद्यार्थ्यांनी 0.1 रँक घेवून भारत देशातून पहिला क्रमांक मिळविला. तसेच राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेमध्ये गुरूदिया होदाडे व तिरूमला होदाडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर ऑलिम्पियाड परीक्षेत रोहीत सवासे, गुरूदिया होदाडे, रूद्र कोयले, व प्रज्ञाशोध परीक्षेत यश मिळविलेल्या साक्षी दुभासे, कांचन हत्ते, मैथिली खर्चे, पुजा तारफे या गुणवंत विद्यार्थ्यांना जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते पुष्पहार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार उपप्राचार्य डॉ.आशा जोशी यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला प्रा.डॉ.जयराम पॉल, दत्ता होळ, मुक्‍ता शेख, अजीम शेख, शिवकन्या चव्हाण, दिपाली चव्हाण यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या