*मुरुड ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत महिला सदस्य गैरहजर तर पती हजर ?*
_मासिक बैठक सी.सी.टी.व्ही कॅमेरा मध्ये घ्या.ग्रामपंचायत सदस्य संतोष काळे_
_
*मुरुड : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मुरुड ग्रामपंचायतीचा उल्लेख आहे या ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत महिला सदस्य गैरहजर असून त्यांचे पती मात्र हजर असतात, मासिक बैठकीत उपस्थित असणाऱ्या महिला सदस्यांच्या व्यक्तींना पायबंद घालावा तसेच मासिक बैठक सी.सी. टी. व्ही. कॅमेरे मध्ये घेण्यात यावी या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य संतोष काळे,सामाजिक कार्यकर्ते विशाल कणसे यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.*
_दिलेल्या निवेदनात विस्तृत असे म्हटले आहे की मुरुड ग्रामपंचायत सतरा सदस्याची असून त्यामध्ये ८ पुरुष व ९ महिला सदस्य आहेत, पण ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत एकही महिला सदस्य उपस्थित राहत नाही, उलट या मासिक बैठकीत त्यांचे पती मात्र उपस्थित राहतात. या विषयी ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामपंचायत सदस्य संतोष काळे यांनी तोंडी वारंवार सांगून देखील महिला सदस्यांच्या पतींना मासिक बैठकीत बसण्याचे निर्बंध मात्र घातले नाही उलट त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करण्यापलीकडे काहीच केले नाही._
*येथील दिव्यांग यांचा पाच टक्के निधी २०१८ ते २०१९ व २०१९ ते २०२० या वर्षातील अद्यापही वाटप केलेला नाही तसेच २०११ ते २०१२, २०१७ ते २०१८ पर्यंतचा मागील निधी खर्च करण्याबाबत ठराव अद्यापही घेतलेला नाही.*
_ग्रामपंचायतीमध्ये काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार सुद्धा ग्रामनिधीतून दिला जातो असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.असे निवेदन गट विकास अधिकारी पंचायत समिती लातूरयांना देण्यात आले आहे._
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.