**श्री रामनाथ विद्यालय आलमला येथे ऍड. एस एस पाटील यांची प्रथम पुण्यतिथी साजरी ***
आलमला ÷ श्री रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आलमला येथे दिनांक 29 जुलै 2021 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात रामनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अडवोकेट एस एस पाटील यांची संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने प्रथम पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम संस्थेचे उपाध्यक्ष श्री सोपान काका अलमलेकर यांनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. त्यानंतर संस्थेचे सर्व संचालक मंडळ रामनाथ शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले एडवोकेट एस एस पाटील यांनी उभी केलेली रामनाथ शिक्षण संस्था मोठ्या सन्मानाने हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक क्रांती करण्यासाठी मार्गदर्शक ठरली आहे. एस एस पाटील यांना जाऊन एक वर्ष झाले परंतु त्यांनी उभे केलेले कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे त्यांनी सिद्धेश्वर सहकारी बँक लातूर स्थापनेपासून आजपर्यंत तीन वेळा चेअरमन व दोन वेळेस व्हाईस चेअरमन म्हणून अतिशय उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या जिल्हा परिषद चा कार्यभार अतिशय चांगला राहिला. विविध धार्मिक सामाजिक शैक्षणिक कार्यामध्ये ते सहभाग घेत. अतिशय मृदू स्वभाविक होते. सर्वांना आपले म्हणून चालणारे आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित होते. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अडवोकेट उमेश पाटील, कोषाध्यक्ष चनबसप्पा निलंगेकर, सहसचिव प्रभाकर कापसे, संचालक श्री मन्मथ आप्पा धाराशिवे , कैलास कापसे शंकर धाराशिवे, मुख्याध्यापिका अनिता पाटील पर्यवेक्षक आवटे ए.आय. व विद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी करोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम सर्वांनी मिळून संपन्न केला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.