औसा शहरातील न्हावी गल्ली येथे तब्बल आठ वर्षानंतर नळाला पाणी !
नगरसेवक गोपाळ धानुरे यांच्या आंदोलनाला यश !
औसा प्रतिनिधी मुख्तार मणियार
औसा शहरातील न्हावी गल्ली येथे गेल्या आठ वर्षांपासून नळाला पाणी येत नसल्याने न्हावी गल्लीतील नागरिक पाण्याविना वंचित होते. प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेवक गोपाळ धानुरे यांनी न्हावी गल्ली येथील पाण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलन करुन केले .न्हावी गल्लीतील नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले.या आंदोलनाला यश आले असल्याचे गोपाळ धानुरे यांनी सांगितले आहे. औसा शहरातील आज न्हावी गल्ली येते नळाला पाणी आल्याने न्हावी गल्लीतील नागरिकांनी आनंद व्यक्त करत नगरसेवक गोपाळ धानुरे यांची विविध ठिकाणी सत्कारही केले. यावेळी नगरसेवक गोपाळ धानुरे पाणीपुरवठा कर्मचारी बाळू बनसोडे, सुधीर बनसोडे सह न्हावी गल्लीतील नागरिक उपस्थित होते.
अखेर आंदोलनाला यश प्रभाग क्र 7 मधील जनतेच्या सहकार्यामुळे दिलेल्या आश्वासनाची आज वचनपूर्ती केली औसा न.प.प्रशासनाच्या व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मायबाप जनतेसाठी 4 वेळा जन आंदोलन उभे करून पिण्याच्या पाण्याचा न्हावी गल्लीतील 7 ते 8 वर्षापासून भेडसावणारा पाणी प्रश्न नवीन पाईप लाईन टाकून कायमस्वरूपी मिटवला.!!
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.