अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद,*
*राज्यात उद्यापासून मान्सून परतणार ? - हवामान विभागाचा नवा अंदाज, जाणून घ्या सविस्तर*
राज्यात मागील काही दिवसांपासून गायब झालेला मान्सून पुन्हा सक्रिय होत असल्याने - शेतकऱ्यांच्या चिंता काहीशा दूर होणार आहेत
त्यानुसार उद्या 8 जुलै नंतर संपूर्ण देशासह राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय होईल - असा अंदाज भारतीय हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी वर्तविला आहे
*पहा पुढील हवामान स्थिती*
● होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार - आजपासून येत्या दोन दिवसांत राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून - राज्यात कोकण वगळता अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे
● त्यामुळे राज्यात पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी - हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळणार आहे
● तसेच आज विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असून - उद्या 8 जुलै रोजी विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे
● त्यामुळे 8 जुलै रोजी विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी केला असून - हवामान तज्ज्ञांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
*हवामान विभागाने दिलेली* - माहिती, प्रत्येक शेतकऱ्यांसाठी नक्कीच खुप महत्वाची आहे -
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.