मा.देवेंद्रजी , ' माय ' ची ' आण ' घेऊन ' खरं ' सांगा बरं ....

 मा.देवेंद्रजी ,

' माय ' ची ' आण ' घेऊन ' खरं ' सांगा बरं ....

----------- -------- -------- -------- ------- ---------




महाराष्ट्र सध्या देशभर चर्चेत आहे , तो विरोधीपक्ष नेत्यांच्या भाकड नौटंकीमुळे.देवेंद्र फडणवीस हे त्या रंगकर्मीचे नाव.' झाले बहू ,  होतील बहू पण यासम हाच ' या उक्तिला तीनदा मातीत घालणारा नटरंग म्हणजे देवेंद्र फडणवीस.श्वापदाचं लक्ष जसं सर्व काळ भक्षा वर असतं , तसं देवाभाऊंचं सत्तेवर.विधान सभेत सत्ता गाजवण्याची संधी मिळाली नाही तर हा पठ्ठ्या विधानभवनाच्या पायऱ्यावर अभिरुप विधानसभा उभी करतो आणि ' अध्यक्ष महाराज ' अध्यक्ष महाराज ' असं किंचाळण्याची हौस पुरी करुन घेतो.

राज्य विधीमंडळाचे दोन दिवसाचे अधिवेशन संपन्न झाले.मराठा , ओबीसी आरक्षण.राज्यसेवेच्या रिक्त जागा , कोराना लस , आणि संभाव्य उपाय योजना , कृषि कायद्याचा मसुदा हे अधिवेशनाचे प्रमुख मुद्दे .पण विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार वरील पैकी एकाही विषयाला भिडलेच नाहीत.गोंधळ , शिवीगाळ , घोषणा ऐवढाच कार्यक्रम त्यांनी राबविला.सरकारला कामचं करु द्यायचे नाही , सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यत पोंहचूच द्यायचे नाहीत , असा तो डाव.हा डाव तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी हाणूण पाडला आणि सरकारने कमी वेळेत अधिक काम केले .

ओबीसीच्या राजकीय आरक्षणा साठी महत्त्वाचा दस्त म्हणून सांख्यिकी माहीती केंद्र सरकार कडून मिळवण्यासाठी विधान सभेत ठराव करायचा होता.असा ठराव करणे घटनासंमत होते.मंत्री छगन भुजबळ यांनी हा ठराव मांडायला सुरुवात केली तेव्हा फडणवीस वारंवार हरकत घेऊ लागले.ठरावातले मुद्दे खोडू लागले.वास्तविक हा ठराव कसल्याही चर्चेविना संमत व्हायला हवा होता.पण फडणवीसांना हा ठरावचं होऊ द्यायचा नसावा.ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण हा प्रश्न प्रलंबीत ठेवून त्यांना राजकारण करायचे होते.माञ हा ठराव मांडला गेला आणि तालिका अध्यक्षांनी तो मतालाही टाकला .अशातच देंवेंद्रजींच्या इशार्यावर कांही भाजपा आमदार वेल मध्ये उतरले.जोरजोरात घोषणा देऊ लागले.अध्यक्षांचा माईक हिसकावला.आणि अर्वाच्च भाषेत तालिका अध्यक्षांना दटावू लागले.अध्यक्षांनी सभा दहा मिनिटासाठी तहकुब केली .तर अध्यक्षांच्या दालनात भाजपा आमदार घुसले.तिथे भास्कर जाधवांना आई बहिणीवर शिवीगाळ केली .अंगावर धाऊन गेले .परिणामी भाजपाच्या बारा आमदारांना अध्यक्षांनी एक वर्षासाठी निलंबीतही केले .

या सार्या प्रकारामुळे जनतेच्या मुळ प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले.रेटले कामकाज सरकार पक्षाने.पण लोकशाहीत कामकाज रेटण्याला कांहीही महत्त्व नसते.प्रत्येक निर्णय घासून पुसून व्हावा लागतो.सत्ताधारी आणि विरोधकाच्या बौद्धिक मंथनातून प्रश्न सुटावे लागतात.पण महाराष्ट्रातला विरोधी पक्ष बौद्धिक दिवाळखोर आहे .तो फक्त गोंधळी आहे .सत्तालालची आहे आणि देवेंद्र फडणवीस नावाचे महा नटनायक दुर्दैवाने विरोधीपक्ष नेते आहेत.

फडणवीसांना मराठा किंवा ओबीसीचे प्रश्न मार्गी लावायचेच नाहीत .ते भिजत ठेवायचे आहेत.आणि सत्ता द्या चार महिन्यात आरक्षण देतो , अशी पुन्हा लबाडी करुन सत्तासोपान गाठायचा आहे .पण महाराष्ट्र आता भाजपापासून खूप सावध आहे.पाच वर्षाचे भाजपाचे काम या राज्याने पाहीले आहे .मराठा घराणे , मराठा संस्था , मराठा मंडळे , आणि औबीसी नेते संपवने एवढाच कार्यक्रम भाजपाने राबविला आहे.त्यामुळे आता महाराष्ट्र भाजपाच्या हाती पुन्हा सत्ता देण्याची शक्यता दुरापास्तच आहे.

भाजपाने हे अधिवेशन वाया घालवीले आहे .फडणवीसाकडे जर ओबीसींना आरक्षण देण्याचा मार्ग होता तर त्यांनी तो का सुचवीला नाही ? हा खरा प्रश्न आहे .विधानसभेचा तीन वर्षाचा कार्यकाळ अजून शिल्लक आहे .याच अधिवेशनात हा प्रश्न मार्गी लागला असता तर राज्यातल्या असंख्य ओबीसींना विविध संस्थावर काम करण्याची संधी मिळाली असती.पण फडणवीसांचे ओबीसी प्रेम बेगडी आहे , हे इथे सिद्ध झाले.आघाडी सरकार हा प्रश्न सोडवीलच , पण त्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल.

सरकारने तीन कृषि विधेयक मांडले , त्यात फडणवीसांनी भाग घेतला नाही .कारण हे तिन्ही विधयेक शेतकऱ्यांच्या हिताचे होते आणि केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याला राज्य स्तरावर चाप लावणारे होते.मोदींची मर्जी राखण्यासाठी आणि या कृषिविधयेका पासून पळ काढण्यासाठीच फडणवीसांनी हे गोंधळ नाट्य घडवीले.

फडणवीसांना मराठा , ओबीसी , रिक्तपदे , शेतकरी कायदे , वीमा कायदा , असे महाराष्ट्राच्या हीताचे कांही घडूच द्यायचे नव्हते .त्यामुळे त्यांनी अशी नौटंकी केली .

केंद्र सरकारकडे उपलब्ध असलेला ओबीसींचा सांख्यिकी डेटा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा ठराव करीत असेल आणि या ठरावाला फडणवीस विरोध करीत असतील तर , महाराष्ट्राने फडणवीसांना विचारले पाहिजे की , माय ची आण घेऊन खरं सांगा , तुम्हाला ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू द्यायचे आहे की नाही ?

जे बारा आमदार निलंबीत झाले , त्यांच्या विषयी तर बोलायलाच नको.त्यांचे वर्तन फक्त फडणवीसा समोर शेपूट हलवून निष्ठा दाखवून देणे इतकेच होते.त्यांना मतदार संघातील जनतेशी काही देणेघेणे नव्हते .आणि निलंबना नंतर भाजपाने जे आंदोलन केले , ते आंदोलन म्हणजे फाटक्या चड्डीला ठिगळ लावण्याचा केविलवाणा प्रकार होता.

औशाचे आमदारही निलंबीत झाले.औशातही भाजपाने या निलंबना विरुध्द आंदोलन केले , त्या विषयी उद्या बोलू. कारण आंदोलन आणि त्यातली भाषणे एक मजेदार गोष्ट होती.आपण का आंदोलन करतोय , हेच मुळात अनेकांना माहीत नव्हते .

                                 -- राजू पाटील, औसा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या