युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकरांचा वाढदिवस
विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होणार..!
भाजयुमोचा पुढाकार ः 50 युवकांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प
विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होणार..!
भाजयुमोचा पुढाकार ः 50 युवकांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प
लातूर दि.29/08/2021
दरवर्षी भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कौटुंबिक, सामाजिक, अध्यात्मिक व आरोग्य विषयक अशा विधायक उपक्रमाने वाढदिवस साजरा केला जात आहे. यामध्ये 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2021 या कालावधीत अनेक सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर व महात्मा बसवेश्वर युवा मोर्चा मंंडल यांच्या सयुंक्त विद्यमाने 50 युवकांनी मरनोत्तर अवयवदानाचा संकल्प केलेला आहे. त्यांच्या सामाजिक उपक्रमाचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या वाढदिवसामानिमित्त 30 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 10 वा. स्वामी विवेकानंद पॉलिटेक्निक सभागृह,एमआयडीसी,कळंब रोड,लातूर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भाजपाचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रामाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य शैलेश लाहोटी यांची उपस्थिती रहाणार आहे.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर व लातूर मनपा स्थायी समितीचे सभापती दिपक मठपती हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच 31 ऑगस्ट 2021 रोजी उदयगिरी लायन्स नेत्र रूग्णालयाच्यावतीने महाराष्ट्र विद्यालय मजगे नगर येथे डोळ्यांचे मोफत ऑपरेशन शिबीर व सर्व रोगनिदान शिबीराचे आयोजन सकाळी 10 वा करण्यात आलेले आहे. या शिबीराच्या अध्यक्षस्थानी जेएसपीएमचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची उपस्थित राहणार आहे. तर उद्घाटक म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांची उपस्थिती लाभणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर देविदास काळे, भाजपा सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष अॅड.शैलेश गोजमगुंडे, उदयगिरी लॉयन नेत्र रूग्णालयाचे अध्यक्ष डॉ.रामप्रसाद लखोटिया, डॉ.गुगळे, डॉ.बालाजी किनीकर, डॉ.विश्रांत भारती, डॉ.वेदांत अवस्थी, डॉ.मनोज कदम, डॉ.दाताळ,डॉ.कोरे, डॉ.संदिप क्षिरसागर, डॉ.रामचंद्र लखणगिरे, डॉ.रवी भातांब्रे, डॉ.शेख आलीम ई, डॉ.श्रृती जाधव, डॉ.गिरवलकर, डॉ.स्वप्नजा यादव, डॉ.शिरीन सय्यद, डॉ.श्रीकांत सुर्यवंशी, डॉ.स्वप्नील तोष्णिवाल, डॉ.आश्विन खुरदळे, डॉ.पुष्पा यादव आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. या बरोबरच भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर व महात्मा बसवेश्वर युवा मोर्चा मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने 50 युवकांनी स्वयंउत्स्फुर्तपणे मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केलेला आहे. हा कार्यक्रम बसवेश्वर चौक, चन्नाबसवेश्वर कॉलेज समोरील विठ्ठल रूक्मिनी मंदिर, माताजी नगर येथे घेण्यात येणार आहे. तसेच 1 सप्टेंबर 2021 रोजी मार्केट यार्डातील गौरीशंकर मंदिरात अभिषेक व कव्हा येथील शेखमियाँ दर्ग्याला चादर चढविण्यात येणार आहे. कोरोनाच्या नियमाचे पालन करून आयोजित सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
----
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.