पारगाव येथील अतिघन आंबा लागवड फळबागेची पाहणी केली व फळबाग तज्ञ डॉ भगवानराव कापसे यांचे मार्गदर्शन प्राप्त केले.
क्रिएटिव्ह फाऊंडेशन, लातूर च्या सहकार्याने मतदारसंघातील ११० शेतकरी व जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी यांच्यासाठी आयोजित ३ दिवसीय #कृषी_अभ्यास_दौरा अंतर्गत आज पारगाव, ता. वाशी, जि. धाराशिव येथील प्रगतिशील शेतकरी श्री सुभाषजी लाखे यांच्या शेतातील अतिघन आंबा लागवड असलेल्या फळबागेस भेट देऊन पाहणी केली व अतिघन फळबाग लागवडीबाबत माहिती घेतली. यावेळी मराठवाड्यातील सुपरिचित फळबाग तज्ञ तथा गटशेती प्रवर्तक डॉ भगवानराव कापसे यांनी आम्हाला फळबाग लागवडीसंदर्भात बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. श्री सुभाषजी लाखे यांच्या शेतात सोबत आलेल्या शेतकऱ्यांसह जेवणाचा आस्वादही घेतला. डॉ भगवानराव कापसे, शेतकरी श्री सुभाषजी लाखे, कृषी पर्यवेक्षक श्री गोपीचंद सूर्यवंशी व उपस्थित गावातील शेतकरी बांधवांचे सहकार्याबद्दल आभार.
Devendra Fadnavis Chandrakant Patil BJP Maharashtra
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.