मोदी सरकारकडून ओबीसींची फसवणूक सत्तेत आल्यावर जनगणना करण्याचा शब्द फिरवला : रेखाताई ठाकूर यांची लातुरात पत्रकार परिषद



मोदी सरकारकडून ओबीसींची फसवणूक

सत्तेत आल्यावर जनगणना करण्याचा शब्द फिरवला : रेखाताई ठाकूर
 यांची लातुरात पत्रकार परिषद








लातूर / सत्तेत आल्यानंतर ओबीसींची जातनिहाय जनगणना करू असे जाहीरनाम्यात नमूद असताना केंद्रातील मोदी सरकारने ओबीसींना दिलेला शब्द पाळला नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली. 
लातूर येथे आयोजित कार्यकर्ता संवाद, समीक्षा, संघटन आढावा मेळाव्यासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाठ, मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी, रमेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष जगदीश माळी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलताना ठाकूर म्हणाल्या की मागील सत्तर वर्षाच्या काळात ज्या ज्या पक्षांनी राज्यावर सत्ता गाजवली त्यातील एकही पक्षाने मराठवाड्याच्या विकासासाठी ठोस पावले उचलली नाहीत. मराठवाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा दुष्काळ, बेरोजगारी,उद्योग धंद्यांचा अभाव दिसून येते. या भागातील अनेक मंत्री, मुख्यमंत्री झाले परंतु यांच्याकडे धोरणच नाही केवळ जाती पातीचे राजकारण करण्यात आले यामुळे मराठवाडा विकासापासून कोसो दूर आहे.याला पर्यायी विकासाचे व्हिजन वंचित बहुजन आघाडीकडे असल्याचे याप्रसंगी रेखा ठाकूर म्हणाल्या.
 कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील पाच जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आले आहेत, रुग्ण संख्या घटल्याने त्या प्रक्रियेस गती मिळावी, याबरोबरच गत निवडणूकित जातीनिहाय जनगणना करण्याचा जो शब्द केंद्र सरकारने दिला होता याची पूर्तता करण्याची मागणी यावेळी केली. जिल्ह्यातील उदगीर येथील लाईफ केअर हॉस्पिटलच्या जवळपास ३०० कर्मचाऱ्यांकडून संचालकांनी ज्या ठेवी ठेवून घेतल्या आहेत, त्या परत करून त्यांना नियमित वेतन देण्यात यावे, जिल्ह्यातील समाजकल्याण  विभागासाठी कंत्राटी तत्वावर कामगार काम करतात यांचे नऊ महिन्यांपासूनचे थकीत वेतन तत्काळ मिळावे यासाठी पक्ष जनआंदोलन उभारणार असल्याचे यावेळी सांगितले.
Attachments area

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या