राजा नारायणलाल लाहोटी स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
लातूर
२९ ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांचा जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मेजर ध्यानचंद यांच्या 116 व्या जयंती निमित्त राजा नारायणलाल लाहोटी स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी स्कूलचे प्राचार्य कर्नल एस ए वरदन, रजिस्ट्रार प्रवीण शिवणगीकर, क्रीडा शिक्षक शैलेंद्र डावळे, सुनील मुनाळे यांच्यासह शिक्षक विनोद चव्हाण, अमित होनमाळे, व कर्मचारी प्रकाश जकोटीया, आशिद बनसोडे, ज्ञानेश्वर गोसावी, चेतन धुर्वे उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच त्यांच्या कार्याला उजाळा दिला. मान्यवरांनी खेळातील सातत्य, सराव या बाबींना कसे महत्त्व आहे याविषयी सखोल मार्गदर्शन केले. क्रीडा दिनाचे औचित्य साधून स्कूलच्या प्रांगणात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ओब्स्टकल कोर्सचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.