अमृत महोत्सवाच्या स्मरणासाठी मुख्यमंत्र्यांना दोन हजार पोस्टकार्ड
भाजपा युमोचा उपक्रम ः पोस्टकार्डद्वारे केला अमृत महोत्सवाचा खुलासा
भाजपा युमोचा उपक्रम ः पोस्टकार्डद्वारे केला अमृत महोत्सवाचा खुलासा
लातूर दि.29/08/2021
भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्या लातूर शहरच्यावतीने भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवनवीन उपक्रम राबविले जातात. त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे स्मरण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना व्हावे या दृष्टिकोणातून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपायुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या सुचनेनुसार राज्यभरातून 75 हजार पोस्टकार्ड पाठविण्यात आलेले आहेत. तर लातूर भाजपायुमोच्यावतीनेही एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 2 हजार पोस्टकार्ड गांधी चौक पोस्ट कार्यालयातून पाठविण्यात आले. त्यांच्या हा सामाजिक भूमिकेतून राबविलेला उपक्रम दिशादर्शक ठरणारा आहे.
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, युवा मोर्च्याचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे स्मरण व्हावे यासाठी महाराष्ट्रातून 75 हजार पोस्टकार्ड पाठविण्यात आलेले आहेत. तर भारतीय जनता युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली लातूर शहरातील गांधी चौक पोस्ट ऑफीस कार्यालयातून 2 हजार पोस्टकार्ड पाठविण्यात आलेले आहेत. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना यावर्षी देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन आहे. तसेच 75 व्या वर्षाला अमृत महोत्सवी वर्ष म्हणतात. याचेही स्मरण कायमस्वरूपी त्यांच्या आठवणीत राहणार आहे.
यावेळी या ऐतिहासिक उपक्रमाला भाजपा युवामोर्च्याचे सरचिटणीस गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, संतोष ठाकूर, शंभूराजे पवार, अॅड.प्रकाश काळे, वैभव डोंगरे, गजेंद्र बोकन, अॅड.हरिकेश पांचाळ, अॅड.सचिन कांबळे, अॅड.पंकज देशपांडे, ऋषी जाधव, संतोष जाधव,प्रतिक बेरकिले, ओम धरणे, महादेव पिटले, सचिन सुरवसे, दुर्गेश चव्हाण, सुनिल राठी, आश्विन तत्तापुरे, राहुल भूतडा, आशुतोष गाडेकर, अजय कोटलवार, गोविंद सुर्यवंशी, रवी लवटे, राजेश पवार, काका चौगुले, अॅड.किशोर शिंदे, राजेश्री होणाळे, अभिजीत मुनाळे, चैतन्य फिस्के, नहुष पाटील, अमर पाटील, शैलेश संपते, आकाश पिटले, सुरज बिराजदार, यशवंत कदम, गणेश बैसाखे, ऋषिकेश क्षिरसागर, सचिन यादव, सोनू गदगे, अल्ताफ शेख, सद्दाम शेख, पापू सुरवसे, रब्बानी शेख, मनोज बायस, आकाश आलापुरे यांच्यासह भाजपा युवा मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.