जिल्‍हा स्‍त्री रूग्‍णालय लातूर येथे गरोदर मातांचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणा बाबत

 जिल्‍हा स्‍त्री रूग्‍णालय लातूर येथे गरोदर मातांचे


कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणा बाबत


 



      लातूर,दि.29(जिमाका) गरोदर मातांना कोविड-१९ आजाराच्‍या प्रादूर्भाव झाल्‍यास गरोदर मातेच्‍या तसेच नवजात अर्भकाच्‍या आरोग्‍यास धोका निर्माण होवू शकतो. त्‍यामुळे गरोदर मातांचे कोविड-१९ आजारपासून संरक्षण करण्‍यासाठी शासनाने गरोदर मातांचे कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करुन घेणे बाबत सुचना दीलेल्‍या आहेत. कोविड-१९ प्रतिबंधक लस ही गरोदर मांतानी गरोदरपणाच्‍या कोणत्‍याही महीन्‍यात घेतली तरी चालते व ही लस गरोदर मातेसाठी व गर्भातील बालकाच्‍या आरोग्‍यासाठी सुरक्षित आहे.


         शहरातील गरोदर मातांच्‍या कोविड १९ प्रतिबंध‍क लसीकरणासाठी जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णालय लेबर कॉलनी येथे प्रत्‍येक सोमवारी तसेच शहरातील सर्व कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण केंद्रावर लसीकरणाची दररोज सोय करण्‍यात आली आहे.


        तरी शहरातील गरोदर मातांनी जिल्‍हा स्‍त्री रुग्‍णायल लेबर कॉलनी येथे प्रत्‍येक सोमवारी किंवा आपल्‍या परीसरातील नजीकच्‍या कोविड १९ लसीकरण केंद्र येथे कोणत्‍याही दिवशी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण करुन घ्‍यावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या