लातूर शहर विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी इम्रान सय्यद यांची निवड
लातूर (प्रतिनिधी)
लातूर शहर महानगरपालिकेतील युवा नगरसेवक, वृक्ष चळवळ आणि सामाजिक कार्यात सक्रिय असणारे इम्रान सय्यद यांची लातूर शहर विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे .
या संदर्भाने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी इम्रान सय्यद यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, पक्षसंघटनेत आपण करीत असलेले कार्य लक्षात घेता पक्ष संघटनेत आपल्यासारख्या तरुण नेतृत्वाची गरज आहे. कामाप्रती असलेला आपला आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी व सातत्य पाहता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने लातूर शहर विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा मा. श्रीमती सोनियाजी गांधी आपले नेते राहुलजी गांधी यांचे विचार आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावरील भूमिका सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असाल याची मला खात्री आहे. यापुढील काळात राज्यातील सर्वसामान्य युवकांचा आवाज बनवून संघटन मजबूत करण्यासाठी पक्षातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी समन्वय साधून काम कराल, सोबतच अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णाजी अल्लावरू भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा श्रीनिवासजी व महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रभारी हरपालसिंहजी चुडासमा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा नानाभाऊजी पटोले आणि विधिमंडळातील काँग्रेस पक्षाचे नेते महसूल मंत्री बाळासाहेबजी,थोरात लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना अमितजी देशमुख यांना अपेक्षित असलेले कार्य आपल्या हातून होईल असा विश्वास ही या नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आला आहे.
इम्रान सय्यद यांच्या नियुक्तीची माहिती मिळतात माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना . अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड किरण जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.