वृक्षारोपणात तांत्रिक पद्धतीचा वापर करून ग्रीन लातूर चळवळीची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे पालकमंत्री ना. अमित देशमुख


वृक्षारोपणात तांत्रिक पद्धतीचा वापर करून ग्रीन लातूर

चळवळीची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे

यासाठी आवश्यक सहकार्य केले जाईल

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख

ग्रीन लातुर वृक्ष लागवडीस भेट व केली पाहणी












 

लातूर प्रतिनिधी (सोमवार दि. २ ऑगस्ट २१)

  लातूर शहरासह जिल्हयात वृक्ष लागवड चळवळ राबविताना ग्रीन लातूरने वृक्ष लागवडीसाठी कार्य करणाऱ्या तज्ञाचा सल्ला घेऊन आणखीन नवीन काय करता येईल जेणेकरून ऑक्सिजनसह नैसर्गिक समतोल राखण्यासाठी मदत होईल. वृक्षारोपण कार्य करताना या कामात तांत्रिक पद्धतीचा वापर करून या चळवळीची व्याप्ती आणखी वाढविण्यासाठी ग्रीन लातूरने प्रयत्नशील राहावे यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल असा शब्द राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी देऊन ग्रीन लातूर चळवळीला शुभेच्छा दिल्या आहेत.

  लातूर शहरातल्या औसा रोडवरील तेरणा वसाहतीत लातूर वृक्षकडून राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड कार्यक्रमास पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्यासह सौ. अदिती अमित देशमुख यांनी सोमवारी दि. २ ऑगस्ट   २१ रोजी दुपारी भेट देऊन वृक्ष लागवडीची पाहणी केली. मैत्री दिनाच्या औचित्त्याने ग्रीन लातूर कडून २७ हजार वृक्षाचे रोपण तेरणा वसाहतीत करण्यात आले आहे. यावृक्ष लागवडीत पारस, पिंपळ, कडूनिंब, आवळा, चिंच, कांचन, वड यासह २७ प्रकारच्या वृक्षाचा समावेश यात आहे. आजवर लातूर शहर व परिसरात तसेच मंदिर, मस्जिद, स्मशानभूमी परिसर, रस्ता दुभाजक, महापुरुषांचे स्मारक परिसर अशा वेगवेगळ्या ठिकाणी ६६ हजार वृक्षाचे रोपण ग्रीन लातूर चळवळी कडून करण्यात आले आहे.

  यावेळी बोलताना ना. अमित देशमुख म्हणाले की, तेरणा वसाहत परिसरात ग्रीन लातूरकडून ऑक्सिजन प्लॅन्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला २७ विविध प्रकारच्या वृक्षारोपण करण्याचा उपक्रम कौतुकास्पद असून वृक्ष लागवड प्रकल्पासाठी ग्रीन लातूरने केलेली जागेची निवड योग्य असून याठिकाणी भविष्यात वृक्ष मोठी झाल्यानंतर नागरिकांना फायद्याचे ठरेल. गेल्या ३ वर्षांपासून ग्रीन लातूरकडून वृक्ष लागवड करणे व ती जगविण्यारचे केले जाणारे काम पाहता शहरातील ४० टक्के ग्रीन कव्हर विकसित करण्याचे आपले उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होईल असे सांगितले.

 यावेळी प्रास्ताविक करताना ग्रीन लातूरचे इम्रान सय्यद यांनी ग्रीन लातूर चळवळीचा जन्म, वृक्ष लागवडीत आजवर केलेले कार्य, आणि भविष्यात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्वप्नातील हरित लातूरची संकल्पना पूर्ण करण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न या बाबत माहिती दिली.

  याप्रसंगी डॉ. पवन लड्डा, इम्रान सय्यद, डॉ. कल्याण बरमदे, डॉ.रमेश भराटे, जलसंपदा विभागाचे रोहित जगताप, डॉ. सुरेखा काळे, समिरुल्ला पटेल, डॉ.भास्कर बोरगावकर, धवल मश्रु, पद्माकर बागल, विशाल राठी, डॉ.सुमन डोळे, मनमोहन डागा, गंगाधर पवार, राहुल माने,आसिफ तांबोळी, खाजा पठाण, सुलेखा कारेपुरकर, महेश गिलडा, दयाराम सुडे, फारुख शेख, अभिजित चिल्लरगे, मुकेश लाटे, आशा आयचीत, प्रिया नाईक, मोहिनी देवनाळे, कल्पना फरकांडे, अमृत पत्की, सुहास पाटील, सीताराम कुंजे, सार्थक शिंदे, अरविंद फड, विजयकुमार कठारे, सुरज साखरे, वैजनाथ वानखेडे, नितीन कामखेडकर, कांत मरकड, पांडुरंग बोडके, शैलेश सूर्यवंशी, बालाजी उमरदंड,ॲड.व्यकटेश ब्याळे, मीनाक्षी बोडगे, विक्रांत भूमकर, विदुल्ला राजमाने, बळीराम दगडे, डॉ.शैलेश पडगीलवार,बाळासाहेब बावणे, विकास कातपुरे, नागसेन कांबळे, पूजा पाटील, सादिक कमलापुरे यांच्यासह ग्रीन लातूर चळवळीचे सदस्य, वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते.

----------------------------–---–---------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या