लातुर जिल्ह्याचे नविन नियम जिलाधिकारी लातूर चे आदेश पहा
लातूर-राज्य सरकारचे संदर्भ क्र . ६ मधील दिनांक ०२.०८.२०२१ अन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देत आहे.१. सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८.०० वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३.०० वाजेपर्यंत सुरु राहतील . रविवारी जीवनावश्यक वगळता ईतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील . २. सर्व सार्वजनिक उद्याने , मैदाने व्यायाम , चालणे , धावणे , सायकलिंग आदींसाठी खुले राहतील . ३. सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु राहतील . प्रवासाची गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांची विभागणी करावी . ४. जी कार्यालये वर्क फ्रॉम होम पद्धतीने सुरु ठेवता येऊ शकतात ती तशी सुरु ठेवावीत . ५. सर्व प्रकारची शेतीविषयक कामे , बांधकाम , वस्तूंची वाहतूक , उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील . ६ , जिम , व्यायामशाळा, योगा केंद्र , ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय ( वातानुकूलन यंत्राच्या वापराविना ) सोमवार ते शुक्रवार रात्री ८.०० वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. शनिवारी दुपारी ३.०० वाजेपर्यंत आणि रविवारी पूर्णपणे बंद राहतील. ७. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील, यात कोणतीही सुट नाही, ८. जिल्हयातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे बंद राहतील. ९. शाळा, महाविद्यालयांच्या बाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांचे आदेश लागू राहतील. १०. सर्व उपहारगृहे, हॉटेल्स, बार, परमिटरूम सोमवार ते शुक्रवार ५० टक्के आसन क्षमतेसह कोविडविषयक सुरक्षा नियमांचे पालन करुन सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. सोमवार ते शुक्रवार दुपारी ४.०० नंतर आणि शनिवार – रविवार टेक अवे / पार्सल सेवा सघ्याप्रमाणे सुरु ठेवता येईल. ११. रात्री ९ .०० ते सकाळी ५.०० या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही. १२. गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक समारंभ, निवडणुका, प्रचार, मिरवणुका, निदर्शन मोर्चे यांच्यावरील निबंध कायम राहतील, १३. फेसमास्क वापरणे, सुरक्षित अंतर, हातांची स्वच्छता यासारखे कोव्हीड प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे बंधनकारक राहील. या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रचलित तरतुदीनुसार कारवाई करावी.१४. विविध कार्यासाठी ( उदा . लग्नसमारंभ, ईतर कार्यक्रम ) निश्चित केलेल्या एस.ओ.पी. लागू राहतील. या एस.ओ.पी. चे तंतोतंत पालन करण्यात यावे. या आदेशात ज्या बाबी नमूद करण्यात आलेले नाहीत त्याबाबत यापूर्वी लावण्यात आलेले निर्बध कायम राहतील. प्रस्तुत आदेश दिनांक ०३.०८.२०२१ रोजी रोजीपासून पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. सर्व संबंधित प्रशासकीय विभाग / संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी या आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करावी. या आदेशाचे किंवा आदेशातील अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधिताविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ , साथरोग प्रतिबंधक कायदा, १८ ९ ७ अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम १८८ नुसार तसेच महाराष्ट्र कोव्हीड -१ ९ उपाययोजना नियम, २०२० ई. मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी .असे जिल्हाधिकारी लातुर यांच्या आदेशात नमूद केले आहे.


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.