थोडेसे माय बापासाठी पण” या उपक्रमांतर्गत
ज्येष्ठ नागरिकांनी सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या
सर्वेक्षकास सहकार्य करावे
लातूर,दि.30(जिमाका) सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाकडून “थोडेसे माय बापासाठी पण” या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यासाठी portal.aadharwad.com हे संकेतस्थळ सुरु करण्यात आलेले आहे. या संकेतस्थळावर सर्व्हेक्षण नमुना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
या सर्व्हेक्षण फॉर्म मध्ये ज्येष्ठ नागरिकांची माहिती भरण्यासाठी आशा वर्कर्स, अंगणवाडी कार्यकर्ती व ग्रामरोजगार सेवक यांचे online प्रशिक्षण पुर्ण करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील सर्व्हेक्षणासाठी काही अडचणी उद्भवल्यास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर व शहरी भागातील सर्व्हेक्षणासाठी जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर विकास विभाग लातूर यांचेशी संपर्क साधावा तसेच ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी संबंधीत तालुक्याचे गट विकास अधिकारी व शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी संबंधीत शहराचे महानगरपालिका आयुक्त व नगरपालिका/नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी आपल्या कार्यरत यंत्रणेमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्व्हेक्षण जलदगतीने करावे.
जिल्ह्यातील ६० वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिकांनी सर्व्हेक्षक आपल्यापर्यंत आल्यानंतर संपुर्ण माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय संनियंत्रण समिती अध्यक्ष पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.