महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा केंद्राच्या
शंभर मिटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
लातूर,दि.30(जिमाका)महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परिक्षा-2020 ही दि. 4 सप्टेंबर 2021 (शनिवार) रोजी सकाळी 11.00 ते 12 .00 वाजपर्यंत लातूर शहरातील विविध 31 उपकेंद्रावर आयोजित करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्राचा तपशील पूढील प्रमाणे आहे.
राजर्षी शाहू वाणिज्य महाविद्यालय बस स्टँड समोर, लातूर, देशीकेंद्र विद्यालय, सिग्नल कॅम्प लातूर, श्रीमती सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, खाडगाव रोड लातूर, यशवंत विद्यालय, नांदेड रोड,लातूर, दयानंद वाणिज्य महाविद्यालय बार्शी रोड लातूर,महात्मा बसवेश्वर विज्ञान महाविद्यालय खंडोबा गल्ली लातूर,संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय,(कॉकसीट) अंबाजोगाई रोड लातूर, (पहिला व दुसरा मलजा) भाग-अ संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय अंबाजोगाई रोड लातूर, (दुसरा व तिसरा मलजा) भाग-ब.
श्री.रविशंकर विद्यामंदिर रिंग रोड लातूर, दयानंद विज्ञान महाविद्यालय बार्शी रोड लातूर, परिमल विद्यालय नारायणनगर लातूर,जिजामाता कन्या प्रशाला नांदेड रोड,लातूर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल दिलीप माने नगर खाडगांव रोड लातूर,एम.एस.बिडवे इंजिनिअरींग कॉलेज बार्शी रोड लातूर, सरस्वती विद्यालय खाडगांव रोड,लातूर दयानंद कला महाविद्यालय बार्शी रोड लातूर,गोदावरी लाहोटी कन्या विद्यालय दयाराम रोड लातूर, राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय बस स्टँड समोर लातूर,ज्ञानेश्वर विद्यालय शाहू चौक नांदेड रोड, लातूर
दयानंद विधी महाविद्यालय बार्शी रोड, लातूर राजमाता जिजामाता ज्युनिअर महाविद्यालय शिवनगर सूतमिल रोड लातूर,पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन नंदी स्टॅाप औसा रोड, लातूर राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय बसवेश्वर चौक पिनाटेनगर लातूर भाग- ब श्री. मारवाडी राजस्थान विद्यालय सिग्नल कँम्प लातूर,शाहू कला महाविद्यालय बस स्टँड समोर लातूर, दयानंद कॉलेज ऑफ बी.सी.ए. बार्शी रोड,लातूर, बसवणाप्पा वाले न्यू इंग्लिश मेडियम स्कूल संभाजी नगर खाडगांव रोड,लातूर श्री. व्यंकटेश विद्यालय झिंगणाप्पा गल्ली लातूर, जयक्रांती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिताराम नगर लातूर,केशवराज विद्यालय श्याम नगर,लातूर या उपकेंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
उपरोक्त परीक्षा केंद्राच्या परिसरात मोठया प्रमाणावर परीक्षार्थी येणार आहेत. त्यामुळे परीक्षा कालावधीत केंद्रावर व परिसरात गर्दी मुळे कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रशन निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी फौजदारी प्रक्रियासंहिता 1973 चे कलम 144 अन्वये मिळालेल्या अधिकाराचा वापर करुन उक्त परीक्षा केंद्राच्या 100 मिटरच्या परिसरात पूढील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
परीक्षा केंद्राचे परिसरात प्रवेश करते वेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात येणार नाहीत. परीक्षा केंद्राचे परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करण्यात येणार नाही. 100 मीटरच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर्स, पानटपरी, टायपींग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनिक्षेपक इत्यादी माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन, सेल्युलर फोन, ई-मेल व इतर प्रसरमाध्यमे घेऊन करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही. परीक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेश मनाई राहील.
हे आदेश परीक्षा केंद्रावर कामकरणारे अधिकारी /कर्मचारी परीक्षार्थी केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचे बाबत त्या परीक्षासंबंधी कर्तव्ये पारपाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत. सदरील आदेश शनिवार दि. 4 सप्टेंबर 2021 रोजीच्या सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत लागू राहतील, असे ही आदेशात नमुद केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.