प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत आज वंचित आघाडीचा कार्यकर्ता मेळावा

 प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत आज वंचित आघाडीचा कार्यकर्ता मेळावा






लातूर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत आज शहरातील मुक्ताई मंगल कार्यालय या ठिकाणी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा तसेच आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, महिला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधती सिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
आगामी काळात होणार्‍या सर्वच निवडणुका वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढविणार असून याची तयारी म्हणून आढावा बैठक तसेच तालुका निहाय कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात पक्ष वाढी संदर्भात तसेच  पदाधिकार्‍यांच्या कामाचाही आढावा घेण्यात येणार आहे.  वंचित बहुजनांच्या न्याय्य हक्कांसाठी आगामी निवडणुकांमध्ये या मेळाव्यात रणनिती आखली जाणार असून या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष जगदीश माळी, महासचिव डॉ. तात्याराव वाघमारे, संघटक सचिन लामतुरे, सुनिल क्षीरसागर, डॉ. संजय कांबळे, हमीद शेख, उध्दव तावडे, श्याम पावले, उध्दव पाटील, प्रा. विनय ढवळे, त्रीशरन वाघमारे आदींनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या