कोल्हापूर येथील सांगली तालुक्यातील चिपळूण मधील पूरग्रस्तांसाठी औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मदत
औसा lप्रतिनिधी
गेल्या आठवडाभर तुफान पडणाऱ्या पावसामुळे कोकण सह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन नद्यांना महापूर आल्याने अनेक गावात घरात पाणी शिरले आणि हा संपूर्ण भाग जलमय झाला. या अतिवृष्टीमुळे या भागातील अनेक घरांचे नुकसान झाले. शेकडो लोक मृत्यूमुखी पडले. शेतकऱ्यांच्या पशुधनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर अनेक लोक अद्यापही बेपत्ता असून हजारो कुटुंबे बेघर झाले आहेत.अशा परिस्थितीत पुरग्रस्तांना फुल नाही फुलांची पाकळी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती तालुका औसा सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद,आडत व खरेदी असोसिएशन हमाल व मुनीम मार्केट यार्डच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील चिपळूण मधील पूरग्रस्तांसाठी 511धान्याचे किट यामध्ये जिवनावश्यक वस्तु (गहु, तांदुळ,आटा,साखर,गोडतेल,साबण आदि) असे बारा जिवनावश्यक वस्तु उपसभापती किशोर जाधव यांनी सोबत जाऊन चिपळूण मधील पूरग्रस्तांसाठी वाटप करणार आहेत.आज दि.2 आगस्ट सोमवार रोजी संध्याकाळी 6 वाजता औसा मार्केट यार्ड येथून 511 किटचा टेम्पो पाठविण्यात आले.यावेळी हि मदत पाठवितांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, उपसभापती किशोर जाधव, सचिन मुश्ताक शेख,आडत व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मदनलाल झंवर, योगेश मुक्ता, गणेश बिदादा,मोहन नलगे, संतोष औसेकर, योगेश जयशेट्टे,भास्कर कदम,अतुल साळुंके,व सर्व आडत व्यापारी व मुनीम संघटना,हमाल संघटना यांच्या उपस्थितीत पुरग्रस्तांना 511 किटचे टेम्पो पाठविण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.