औसा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ. किर्ती ताई कांबळे यांची निवड
औसा मुख्तार मणियार
औसा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज दिनांक 2 आगस्ट 2021 सोमवार रोजी नगरपरिषदेच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष सभेस नगराध्यक्ष, सदस्य व नामनिर्देशित सदस्य असे एकूण 13 जण उपस्थित होते. सदरची सभा ही कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली होती. औसा नगर परिषद च्या उपनगराध्यक्षपदी प्रभाग क्रमांक 03 च्या नगरसेविका सौ. कीर्ती अशोक कांबळे यांची निवड करण्यात आली.औसा नगरपरिषदेच्या इतिहासातील पहिली नवनिर्वाचित मागासवर्गीय महिला उपनगराध्यक्षा सौ. कीर्ती अशोक कांबळे यांची निवड झाली आहे. याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर अफसर शेख, मुख्याधिकारी वसुधा फड व सर्व नगरसेवक व कर्मचाऱ्यांनी या निवडीबद्दल अभिनंदन केले. माजी उपनगराध्यक्ष जावेद शेख, नगरसेवक मुजाहेद शेख, पाणीपुरवठा सभापती गोविंद जाधव, माजी उपनगराध्यक्ष मेहराज शेख, माजी उपनगराध्यक्ष भरत सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष सौ.जहॉआरा तत्तापुरे, नगरसेविका परवीन शेख,सौ रुमा काझी,सौ इनामदार,स्विकृत नगरसेवक रूपेश दुधनकर, अविनाश टिके आदि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.