राज्याच्या कृषी राज्य मंत्रि विश्वजित कदम च्या मतदारसंघात शेती पम्पा चे वीज कनेक्शन तोडो नहेत म्हणून शेतकऱ्याचं आक्रोश*

 *प्रतिनिधी समीर तांबोळी*


सल्ग  :- *राज्याच्या कृषी राज्य मंत्रि विश्वजित कदम च्या मतदारसंघात शेती पम्पा चे वीज कनेक्शन तोडो  नहेत  म्हणून शेतकऱ्याचं आक्रोश*








 अँकर :-  कडेगाव तालुक्यातील शेती पम्पा चे बंद केलेले ट्रान्सफॉर्मर तात्काळ सुरू करण्यात यावेत. अशा मागणीचे निवेदन महावितरण कंपनीने सहायक अभियंता अजय काशिद यांना दिले 

महावितरण कंपनीने शेतीपंपाच्या वीज बिल थकबाकी वसुलीसाठी कडेगावतालुक्यातील वांगी येथील दहा ट्रान्सफॉर्मर बंद केले आहेत. त्यामुळे शेती पिकांचं मोठ नुकसान होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कडेपूर येथील कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला तसेच बंद केलेले ट्रान्सफॉर्मर दोन दिवसांत सुरू करावेत. अन्यथा शुक्रवार दि.२७ रोजी वांगी येथील एस.टी.स्टॅणड चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

    महावितरण कंपनीच्या कडेपूर येथील शाखा कार्यालयातील सहायक अभियंता अजय काशिद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरण कंपनीने सध्या गावातील काही शेतकऱ्यांची शेतीपंप वीज बिल थकबाकीसाठी वीज तोडण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीने अचानक कोणतीही पूर्वकल्पना न देता शेती पंपाची वीज तोडल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. जनावरांचे पाण्याअभावी आबाळ होत आहे. तरी महावितरण कंपनीने वांगी गावामध्ये जे ट्रान्सफॉर्मर बंद केले आहेत. ते ट्रान्सफॉर्मर तातडीने सुरू करावेत. तसेच वीज बिल थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांना हप्ते पाडून द्यावेत. अन्यथा गावातील सर्व शेती पंपाचा वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात यावेत. याबाबत दोन दिवसात निर्णय घेऊन शेती पंपाची बंद केलेली वीज ताबडतोब सुरू करावी. अन्यथा गावातील संपूर्ण शेती पंपाची वीज बंद करावी. याबाबत दोन दिवसात योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा शुक्रवारी दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता वांगी येथे एस. टी. स्टँड चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

     यावेळी राजेंद्र मोहिते, दाजीराम मोहिते, हणमंतराव मोहिते, सुधाकर मोहिते, शिवाजी मोहिते, सुधीर मोहिते, रमेश एडके, लहू मोहिते, विशाल मोहिते, प्रज्योत मोहिते, इंद्रजित मोहिते, गोविंदा मोहिते, अजय मोहिते, अरुण मोहिते, विपुल मोहिते, अधिक मोहिते, लालासो मोहिते, पांडुरंग मोहिते, सुकुमार कदम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या