राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, लातूर जिल्हा कार्यकारणीची बैठक संपन्न.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लातूर जिल्हा कार्यकारिणीची स्वानंद मंगल कार्यालय, लातूर येथे पक्ष निरीक्षक वसंतराव सुगावे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी लातूर शहर, लातूर ग्रामीण यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व विभागाचे तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्यकारणी शहराध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फ्रंटल सेल, महिला राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विद्यार्थी, सामाजिक न्याय विभाग,ओ.बी.सी सेल, सेवादल सेल, आदींची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच काही प्रश्न हाताळण्यात आले. पक्ष कुठे कमी पडत आहे आणि पक्षवाढीसाठी काय करता येईल यावरही चर्चा झाली. बूथ संघटन मजबूत करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करणे. तसेच 'एक बूथ दहा युथ' ही मोहिम प्रभावी पणे राबवा अश्या सूचना बैठकीत करण्यात आल्या,तसेच आपसातले मतभेद विसरून एकजुटीने आपल्याला काम करायचं आहे.येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्याला अधिक जागा जिंकायच्या आहेत. हा संकल्प घेऊन सर्वांनी कामाला लागा. असा संकल्प बैठकीत केला. तसेच सर्व सेल च्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कामकाजाचा अहवाल दिला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष,आ.बाबासाहेब पाटील लातूर शहरजिल्हाध्यक्ष मकरंदभैय्या सावे,प्रदेश सरचिटणीस आशाताई भिसे,प्रदेश सचीव संजय शेटे, प्रदेश संघटक सचीव मुफ्ती फैय्याज अली,ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष अफसर शेख,लातूर शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील,माजी जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ,माजी महापौर जमील अख्तर मिस्त्री,नगरसेवक राजा मणियार,अल्पसंख्याकचे रशीद शेख, रेखाताई कदम, विशाल विहीरे,गजानन खमीतकर,समीर शेख,पुजा गोरे,मनिषा कोकणे,स्नेहा मोटे,साक्षी कांबळे,जितेंद्र गायकवाड,राहुल कांबळे,टिल्लू शेख,नामदेव जाधव,किरण बडे,राजेश खटके,फारुख तांबोळी,बरकत शेख,अनिल गायकवाड,बाळासाहेब जाधव,अलीम काजी,रामभाऊ रायेवार,शेखर हविले, इब्राहिम सय्यद,सोहम गायकवाड,स्वप्नील दिक्षीत,प्रदीप पाटील,ताज शेख,सद्दाम पटेल,मुन्ना खान,एहरार हक्कानी,प्रवीण थोरात,परवेझ सय्यद,जहांगीर शेख,नवनाथ आल्टे,मुन्ना तळेकर,सय्यद इर्शाद,इरफान बागवान,शाहरुख पठाण,आदर्श उपाध्याय,डी.उमाकांत यांच्यासह सर्व सेल पदाधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.