*फरीद शेख मारहाण प्रकरणी न्याय अखेर गुन्हा दाखल* पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, पोलीस वाहन चालक पोकॉ मुक्रम पठाण यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यावर आनंदनगर पोलीस स्टेशन मद्ये गुन्हा दाखल करण्यात आला,, *अल्ताफ शेख प्रतिनिधी*
उस्मानाबाद - फरीद शेख मारहाण प्रकरणी अखेर आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, पोलीस वाहन चालक पोकॉ मुक्रम पठाण यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यावर आनंदनगर पोलीस स्टेशनच गुन्हा दखल करण्यात आला आहे. उस्मानाबाद लाइव्हने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.
शहरातील ज्ञानेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका पान टपरीवर शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास फरीद शेख ( वय २६, रा. समर्थनगर ) हा तरुण उभारला होता. यावेळी आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चव्हाण आणि त्यांचा चालक पठाण आले आणि त्यांनी टपरी चालकास पान-सुपारीची मागणी केली
यावेळी अन्य दोन ग्राहक उभारले होते. पान टपरी चालकास पान देण्यास उशीर झाल्याने पोलीस निरीक्षक चव्हाण यांचा चालक मुक्रम पठाण याने ' तुला साहेब दिसत नाहीत का ? तुला पोलिसांचा इंगा दाखविला पाहिजे असे म्हणून अश्लील शिवीगाळ सुरु केली.
यावेळी टपरी चालकाचा मित्र फरीद शेख याने पठाण यास शिवीगाळ करू नका म्हणून मध्यस्थी केली असता, तू मध्ये पडू नको म्हणून पठाण याने त्यासही शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर त्याने पोलीस गाडीत बस म्हणून जबरदस्तीने गाडीत बसविले आणि आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये नेले.
*उस्मानाबादच्या आनंदनगर पोलीस चा कारभार*
*वर्दी माधिल गुंड प्रवृतिचे दर्शन पोलीस कायदा व सुव्यवस्था आणि पोलीसांची कामगिरी यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. फरीद शेख याना बेदम मारहान,*(वीडियो)
आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक चव्हाण, मुक्रम पठाण आणि अन्य दोन पोलिसांनी फरीद शेख यास लाथाबुक्यांनी आणि बेल्स्टने डोक्यावर आणि हातापायावर रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली होती.
याप्रकरणी उस्मानाबाद लाइव्हने या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक सतीश शाहू चव्हाण यांची सोलापूरच्या ट्रेनिंग सेंटरला उचलबांगडी करण्यात आली आहे.
वादग्रस्त पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण यांची सोलापूरच्या ट्रेनिंग सेंटरला उचलबांगडी
दरम्यान , फरीद शेख मारहाण प्रकरणी पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण, पोलीस वाहन चालक पोकॉ मुक्रम पठाण यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यावर आनंदनगर पोलीस स्टेशनच गुन्हा दखल करण्यात आला आहे. भादंवि ३४१, ३२४,३२३,५०४,३४ आदी कलमे लावण्यात आली आहेत. त्यामुळे पोलीस खात्यात एकाच खळबळ उडाली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.