केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात लातूर जिल्ह्यातील शिवसेना आक्रमक 


नारायण राणेंना लातूरात फिरू देणार नाही : शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शेळके 



लातूर 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले व नारायण राणे यांना लातूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव शेळके यांनी दिला. 


महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीत नारायण राणे यांनी केलेलं वक्तव्य हे शिवसनैनिकांच्या चांगले जिव्हारी लागले असून त्याची किंमत भविष्यात नारायण राणे यांना मोजावी लागेल. प्रत्येकवेळी मुख्यमंत्र्यावर होणारी टिका पक्षप्रमुखामुळे शिवसैनिक शांत होता. पण कालचा प्रकार शिवसैनिकांच्या चांगलाच जिव्हारी लागला असून नारायण राणेंच्या विरोधात जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र पेटून उठला आहे आणि जेंव्हा शिवसैनिक पेटून उठतो त्यावेळी पळायलाही रान पुरत नाही असा अनुभव महाराष्ट्रातील काही दिग्गज नेत्यांना आहे. म्हणून शिवसेनेचे हे आंदोलन महाराष्ट्राला दिशा देणारं की नारायण राणेला दशा देणारं हे ठरणार हे येणारा काळच ठरवेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शेळके यांनी दिली. यावेळी शिवसेना लातूर शहराच्या वतीने अप्पर पोलीस अधिक्षक हिम्मत जाधव यांना निवेदन देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी युवा सेना संपर्क प्रमुख प्रा. सुरज दामरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विष्णु साबदे, शंकर रांजणकर, जिल्हा युवा अधिकारी कुलदिप सुर्यवंशी, महानगरप्रमुख विष्णुपंत साठे, तालुका प्रमुख बाबुराव शेळके, शहर प्रमुख रमेश माळी, किसन समुद्रे, महासगर संघटक योगेश स्वामी, माजी मनपा नगरसेवक सुनिल बसपूरे, माजी नगरसेवक सतिश देशमुख, पवन जोशी, दिपक आपरे, प्रा.सोमनाथ स्वामी डिगोळकर, राहुल रोडे, अमर बुरबुरे, युवराज वंजारे, सचिन नळेगावकर, नागनाथ वलसे, कालिदास मेटे, वसंत बेंबडे, संदिप जाधव, दिनेश बोरा, राहुल डोपारे, दिलीप भांडेकर, वाघमारे अण्णा, नागुअण्णा सुतार, रघु बनसोडे, अक्षय चवळे, शिवराज मुळावकर व व्यपारी आघाडी जिल्हाप्रमुख बस्वराज मंगरूळे, शहर प्रमुख नागेश कोळपे, बँक कर्मचारी जिल्हाप्रमुख सी.के. मुरळीकर, आर.एस.चव्हाण, अण्णा कोळी आदीसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या