ज्योती गायकवाड नामक मुलगी कोणास आढळल्यास
पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा
लातूर,दि.24 (जिमाका) फिर्यादी दत्ता बळीराम गायकवाड वय 40 वर्षे व्यवसाय मजुरी रा. पाटोदा बु. यांनी दिनांक 16 ऑगस्ट 2021 रोजी पो.स्टे. ला फिर्याद दिली की, त्यांची मुलगी ज्योती दत्ता गायकवाड वय 15 वर्षे रा.पाटोदा बु. ही दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी 9.30 वा. सुमारास ज्ञानविकास विद्यालय पाटोदा बु. येथे शाळेत जाते म्हणून गेली ती परत आली नाही कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे. वगैरे फिर्याद वरुन पो.स्टे. जळकोट गु.र.नं. 128/2021 कलम 363 भा.द.वि. प्रमाणेचा गुन्हा दाखल आहे.
मुलीचे वर्णन पूढील प्रमाणे आहे. रंग सावळा,उंची 4 फूट 5 इंच, अंगाने सडपातळ, नाक सरळ, चेहरा गोल,अंगात पांढऱ्या रंगाचा ठिकापके असलेला पंजाबी ड्रेस,केस काळे, पायात काळया रंगाची स्लिपर, 10 वी वर्गात शिक्षण घेत आहे. सदरील वर्णनाची मुलगी कोणास आढळल्यास पोलसी स्टे. जळकोट ला संपर्क साधावा असे पोलीस उप निरीक्षक पोलीस स्टेशन,जळकोट यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.