अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलानी
शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा
लातूर,दि.24 (जिमाका) समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, लातूर कार्यालयामार्फत अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती देण्यात येते. या शिष्यवृत्ती करीता इयत्ता 1 ली ते 10 वी वर्गातील सर्व प्रर्वगातील विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो.
या योजनेकरीता अस्वच्छ व्यवसायात काम करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून ग्रामपंचायत क्षेत्र, ग्रामसेवाक व सरपंच, नगरपालिका क्षेत्र, मुख्याधिकारी व महानगरपालिका क्षेत्रात, आयुक्त / उपायुक्त यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या शिष्यवृत्तीचे दर हे 2020-21 पर्यंत रु. 1 हजार 850/- प्रति विद्यार्थी होते तर सध्यस्थित शिष्यवृत्तीचे दर हे रु. 3 हजार प्रति विद्यार्थी आहेत. या योजनेच उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे तथा गरजू विद्यार्थ्यांना लेखन शैक्षिनिक साहित्य खरेदी करणे शक्य व्हावे असे आहेत.
या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ सन 2021-22 करीता सर्व प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे, समाज कल्याण सभापती रोहीदास वाघमारे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापकास संपर्क करण्याचे कळविण्यात येत आहे. पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आधारलिंक बँक खाते क्रमांकावर जमा करण्यात येत असल्याने अर्ज करण्यासाठी बँक खाते क्रमांक व इतर आवश्यक कागदपत्र विद्यार्थ्यांनी पालकांनी त्वरीत प्राप्त करुन घ्यावेत असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.