*तपसेचिंचोली येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी*

 *तपसेचिंचोली येथे  अण्णाभाऊ साठे  यांची  जयंती उत्साहात  साजरी*











औसा प्रतिनिधी:- अवघ्या दीड दिवसाचे शिक्षण घेऊन साहित्याचा मान मिळवणारे साहित्यरत्न ,लोकशाहीर, जगतविख्यात अण्णाभाऊ साठे यांची  जयंती औसा  तालुक्यातील तपसे  चिंचोली  येथील साठे नगर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


प्रारंभी तपसेचिंचोली गावचे सरपंच विश्वंभर सुरवसे, उपसरपंच युवराज यादव , राजेश्वर  पाटील , माजी सरपंच मारुती नेटके , ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कांबळे  यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.


यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण  करण्यात आले.

यावेळी खंडू नेटके,राहुल घुळे,प्रमोद नेटके ,शंकर कांबळे, मैनू पठाण ,मनोज मुळे , व्यंकट बिराजदार,अवधूत नेटके,प्रशांत कुलकर्णी ,विवेकानंद पाटील ,पंकज लोखंडे,माधव कांबळे,पत्रकार प्रशांत नेटके यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते.


*ग्रामपंचायत कार्यालय  तपसे चिंचोली*


औसा तालुक्यातील तपसे चिंचोली  येथील ग्रामपंचायत कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ,सरपंच विश्वंभर सुरवसे, उपसरपंच युवराज यादव ,माजी सरपंच मारुती नेटके यांच्या शुभहस्ते  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी राजेश्वर पाटील ,प्रमोद  नेटके, प्रशांत कुलकर्णी,खंडू नेटके,व्यंकट बिराजदार, मनोज मुळे ,विवेकानंद पाटील ,राहुल घुळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या