शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला अधिकाऱ्यांवरील हल्ला लांच्छनास्पद -आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे टीकास्त्र

 

शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला अधिकाऱ्यांवरील हल्ला लांच्छनास्पद
  -आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे टीकास्त्र










लातूर/ प्रतिनिधी: महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायांची कर्मभूमी आहे.राज्यातील महाविकास आघाडी सरकार शिवरायांचे नाव घेऊन कारभार करत असल्याचे भासवते.परंतु याच सरकारच्या कारकिर्दीत महिला अधिकाऱ्यावर हल्ले केले जात असून ही बाब लांच्छनास्पद आहे,अशा शब्दात माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.
  ठाणे येथील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.यात त्यांची तीन बोटे कापली गेली.या घटनेचा निषेध करताना आ.
निलंगेकर म्हणाले की,महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्यास राज्य सरकारने तात्काळ अटक करणे आवश्यक होते.याउलट सरकारकडून अधिकाऱ्यांवरच दबाव टाकला जात आहे.ही बाब चुकीची आहे.छत्रपती शिवराय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावांचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार करतात.पण ज्या पद्धतीने शिवरायांनी महिलांचा सन्मान केला तो कुठेही दिसत नाही.भारतीय जनता पक्ष या घटनेचा निषेध करत आहे.अधिकारी व कर्मचारी ठिकठिकाणी निषेध व्यक्त करत आहेत.राज्यातील तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेचा निषेध नोंदवावा.निषेधाच्या पोस्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात,असे आवाहनही आ.निलंगेकर यांनी केले.
  राज्य सरकारचे प्रशासनावर नियंत्रण नाही.महिला अधिकाऱ्यांचा सन्मान केला जावा याकडे त्यांचे लक्ष नाही.राज्यातील महिला सुरक्षित नाहीत.ठाणे येथील घटनेत महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्यास तात्काळ अटक करावी.त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही आ. निलंगेकर यांनी यावेळी बोलताना केली.


--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या