अधिकारी - कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामे समन्वयाने पार पाडावीत
कामकाजातूनच आपली ओळख निर्माण होते
--- जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के
लातूर, दि.31(जिमाका):- प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन काम करीत असतांना सर्व कामे समन्वयाने पार पाडल्यास वेगळेच समाधान मिळते या कामकाजातूनच आपली ओळख निर्माण होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के यांनी केले.
येथील जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांची कोल्हापूर येथे बदली झाल्याने त्यांना जिल्हा माहिती कार्यालय व विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेल्या निरोप कार्यक्रमाप्रसंगी त्यांनी केले. या कार्यक्रमास इतिहास संशोधक विवेक सौताडीकर उपस्थित होते. प्रारंभी विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संयुक्तरित्या भेटवस्तु, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व फेटा देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
या निरोप कार्यक्रमास मार्गदर्शन करतांना श्री. सोनटक्के म्हणाले की, प्रशासनात बदली ही होतच असते. प्रत्येक अधिकारी – कर्मचारी वर्गाने कार्यालयीन कामकाजात समन्वय ठेवून कामकाज केल्यास कामाचा उरक तर होतोच पण सर्वांना काम केल्याचे समाधान मिळते. आपण ज्या - ज्या बदली होवून जावू त्या – त्या ठिकाणी आपण आपले काम निष्ठेने करुन आपली ओळख निर्माण करावी, असेही त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी इतिहास संशोधक विवेक सौताडीकर आणि कार्यालयातील मनिषा कुरुलकर, विशाखा शेंडगे, आश्रुबा सोनवणे, दिलीप वाठोरे व सिध्देश्वर कोंम्पले यांनी आपआपली मनोगते यावेळी व्यक्त केले.
या कार्यक्रमास विभागीय माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपीक मनिषा कुरुलकर, विशाखा शेंडगे, विभागीय माहिती कार्यालयातील चंद्रकांत गोधणे, जिल्हा माहिती कार्यालयातील सर्वसाधारण सहाय्यक अहेमद बेग, लेखा लिपीक दिलीप वाठोरे, सिनेयंत्रचालक आऋुबा सोनवणे, वाहन चालक रामकिशन तोकले, संदेशवाहक अशोक बोर्डे, कलीम शेख आदि उपस्थित होते. यावेळी विभागीय माहिती कार्यालयातील लेखापाल अशोक माळगे यांनी प्रास्ताविक व सुत्रसंचालन केले.
00000
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.