नवी नियमावली जाहीर ; पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम!
अल्ताफ शेख प्रतिनिधी/उस्मानाबाद,
मुंबई-राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनलॉकबाबतची नवी नियमावली आज जाहीर केली आहे. यामध्ये व्यापारी वर्गांचा रोष पाहता व आज सांगलीत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितल्या प्रमाणे दुकांनाच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. या नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत तर, शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत. या अनलॉकच्या नव्या नियमावलीकडे अवघ्या राज्याचं विशेष करून व्यापाऱ्याचं जास्त लक्ष लागलेलं होतं. यामुळे राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. कारण, ज्या भागात सध्या करोनाबाधितांची संख्या वाढत आहे, तिथे हा दिलासा नसणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही देखील माहिती आज दुपारी दिली होती. त्यामुळे ज्या ठिकाणी रूग्ण कमी होताय तिथल्या नागरिकांसाठी हा दिलासा असणार आहे. तर, पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम असणार आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे रुग्ण 40 हजारांपेक्षा जास्त संख्येने आढळून येत आहेत. महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात गेल्या काही दिवसांपासून दररोज 6 ते 7 हजार रुग्ण आढळत आहेत. ही स्थिती राज्याची चिंता वाढवणारी आहे. राज्य सरकार काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याबाबत विचार सुरू असल्याचं कळतंय. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमणाचा दर दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावण्याची सूचना केंद्र सरकारने राज्यांना दिली आहे. महाराष्ट्राला देखील केंद्रानं सूचना दिल्या आहेत.
राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये अधिक रुग्ण
महाराष्ट्रातील 11 जिल्हे असे आहेत या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. संक्रमणाचा दर जास्त आणि कोरोना रुग्ण अधिक आढळत असल्यानं त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लागण्याची शक्यता पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. सक्रीय कोरोना रुग्ण अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे
गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या 6 ते 7 हजारांच्या दरम्यान
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी सहा ते सात हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करण्यातील एखादी चूक देखील मोठ्या संकटाला कारणीभूत ठरू शकते. राज्यात येत्या काळात एका दिवसात दहा हजार रुग्ण देखील आढळू शकतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये पूर्ण लॉकडाऊन लावलं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रविवारी राज्यात किती रुग्ण आढळले?
महाराष्ट्रात रविवारी 6479 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 157 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. रविवारी 4110 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना मुक्त होण्याचा दर 96.59 वर पोहोचला आहे.
त्या अकरा जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्ण किती?
पुणे (15680), सातारा (8153), सांगली, (7546) कोल्हापूर (5970), अहमदनगर (6610), सोलापूर (4936), रायगड (2830), रत्नागिरी (2249), सिंधुदुर्ग(1986), बीड (1831), पालघर (1115) सक्रिय रुग्ण आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.