लातूर कॉलेज ऑफ सायन्स, लातूर महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

 *लातूर कॉलेज ऑफ सायन्स, लातूर महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*







लातूर दि.०३/०८/२०२१ रोजी मराठवाड्यातील १२ वी विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला असून  लातूर कॉलेज ऑफ सायन्स, बसवेश्वर चौक, लातूर महाविद्यालयचा निकाल १००% लागला आहे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च-एप्रिल २०२१ या परीक्षेसाठी महाविद्यालयातून एकूण ७१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता त्यापैकी ५९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर १२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. महाविद्यालयातून प्रथम आलेली विद्यार्थिनी कु. लंगर श्रेणिका गोविंद ९३.३३% व्दितीय कु.येलगुंडे प्रतीक्षा रामेश्वर  ९१.८३% तृतीय कु.राठोड कल्पना विकास ८९.८३% तसेच कु.गिरी नंदकिशोर राजेंद्र ८९. ५०%, कु.जाधव आभा बालाजी ८९.५%, कु. जाधव परिमल गोविंद ८९.५% या गुणवंतांचा सत्कार संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. जयदेवी बावगे कोष्याध्यक्ष श्री.शिवलिंग जी जेवळे, लातूर कॉलेज ऑफ फार्मसी,हासेगाव च्या प्राचार्या डॉ.श्यामलीला बावगे मॅडम, ज्ञानसागर विद्यालय हासेगाव चे मुख्याध्यापक श्री. कालिदास गोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री भीमाशंकरअप्पा बावगे , सचिव  श्री वेताळेश्वर बावगे  ,लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी लातूर चे  प्राचार्य श्री नंदकिशोर बावगे, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी चे प्राचार्य रबीक खान , राजीव गांधी पॉलीटेकनिक च्या प्राचार्या सौ योगिता बावगे  , गुरुनाथअप्पा बावगे  इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल चे मुख्याध्यापक आनंद शेंडगे आणि  लातूर सायन्स कॉलेज चे  श्री अनंत लांडगे ,लातूर कॉलेज आय टी आय कॉलेज प्राचार्य सतीश गायकवाड इत्यादी मान्यवरांनी महाविद्यालयातील  गुणवंत विद्यार्थ्यांचे  भरभरून कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या