उस्मानाबाद-कळंब तालुक्यातील सोयाबीन पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

 *उस्मानाबाद-कळंब तालुक्यातील सोयाबीन पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा





*





       अल्ताफ शेख प्रतिनिधी/उस्मानाबाद     

           शेतकऱ्यांना २५% आगाऊ नुकसानभरपाई देण्याची अधिसूचना विमा कंपनीस निर्गमित..


सोयाबीनचे पीक फुलोऱ्यात असताना पावसात मोठा खंड पडल्याने सोयाबीनच्या संभाव्य उत्पादनात ५०% पेक्षा अधिक घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उत्पादनात ५०% पेक्षा अधिक घट अपेक्षित असल्यास एकूण अंदाजित पीकविमा रकमेच्या २५% रक्कम आगाऊ पीकविमा देण्याची तरतूद आहे. त्याच तरतुदीच्या आधारे विहित वेळेत कार्यवाही पूर्ण करून शेतकऱ्यांना २५% आगाऊ पीकविमा देण्याचे पीकविमा कंपनीला निर्देश द्यावेत अशी विनंती खासदार श्री.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री.कौस्तुभ दिवेगावकर यांना केली होती. या मागणीला सकारात्मकता दर्शवीत उस्मानाबाद-कळंब तालुक्यातील पिकविमाधारक शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकासाठी २५% आगाऊ नुकसानभरपाई देण्याच्या सूचना मा. जिल्हाधिकारी महोदयांनी पीकविमा कंपनीला दिल्या. आज तशी अधिसूचनाही निर्गमित करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या