*स्थानिक गुन्हे शाखा लातूर ची कारवाई. मोटारसायकल चोरी मधील आरोपीला अटक.02 मोटारसायकली, 05 मोबाईल असा एकूण 1,36,500/- मुद्देमाल हस्तगत.*

  *स्थानिक गुन्हे शाखा लातूर ची कारवाई. मोटारसायकल चोरी मधील आरोपीला अटक.02 मोटारसायकली, 05 मोबाईल असा एकूण 1,36,500/- मुद्देमाल हस्तगत.*








लातूर रिपोर्टर




               या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यात करिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपाधीक्षक (गृह) श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात लातूर जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याचे विशेषतः मोटारसायकल चोरी संबंधाने घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा चे अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात आली होती.

               सदर मोहीम अंतर्गत पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.सदर पथक जिल्ह्यामध्ये घडलेल्या मालाविषयक गुन्ह्याच्या तपासाचे व उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करीत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की पोलीस ठाणे गांधी चौक येथे दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीतील संशयित आरोपी नवीन रेणापूर नाका परिसरात त्याने चोरलेले मोटरसायकल व मोबाईल विकण्याच्या प्रयत्नात परिसरात फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने सदर पथकाने नवीन रेणापूर नाका परिसरात सापळा लावला. माहितीप्रमाणे मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे-


1) महादेव नवनाथ खाडप, वय 27वर्ष, राहणार-सरस्वती नगर रोड, लातूर. यास पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार 

1) प्रफुल श्रीमंत गायकवाड सिद्धार्थ सोसायटी लातूर.

याचे मदतीने 02 मोटर सायकल तसेच बसस्थानक लातूर येथून 5 मोबाइल चोरी केले आहेत. असे सांगितल्याने सदर चे मोटरसायकली व पाच विविध कंपनीचे मोबाईल त्याचे ताब्यातून जप्त करण्यात आले.ते खालील प्रमाणे


1) हिरो कंपनीची मेट्रो डीलक्स मोटर सायकल चेसी नंबर- MBLIF32ABEGA38303


2)टीव्हीएस कंपनीची विक्टर मोटरसायकल चेसी नंबर- MD625GF19H1H64479 


3) Realme 7 

IMEI number 

8660 89040 8 94954 43

8660 89040 8949 4743


4) Vivo 1938

IMEI number

8679 40059 136993

8679 40059 136985


5) Oppo Reno 3 4G

IMEI number

8668 30042 48451

8668 30044 24844


6) Samsung galaxy A21s

 IMEI number

3535 149 1254 19101

352 9018 7254 19101


7) Karbonn K9

IMEI number

35 3076 11899 9880

35 3076 11899 9898


असा  एकूण 1,36,500/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच पोलिस स्टेशन गांधी चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 463/21 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने आरोपी महादेव नवनाथ खाडप यास नमूद मुद्देमालासह पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे गांधी चौक यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

              गुन्ह्याचा पुढील गांधी चौक पोलीस स्टेशन चे पोलिस करीत आहेत.

             सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे ,अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपाधीक्षक (गृह) श्रीमती प्रिया पाटील यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार- राम गवारे, योगेश गायकवाड, हरून लोहार , प्रमोद तरडे, भीष्मानंद साखरे, चालक अंमलदार लांडगे यांनी बजावली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या