बालसंगोपन योजने अंतर्गत अनाथ मुलांचे 116 प्रस्ताव मंजूर
एमपीजेच्या पाठपुराव्याला यश
लातूर : महाराष्ट्र शासनाच्या बालसंगोपन योजने अंतर्गत वय 0 ते 18 वर्ष पर्यंतचे अनाथ बालके, एकपालक बालके, तीव्र मतिमंद बालके, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, कुटूंब वाद, कुष्ठरूग्ण व इतर गंभीर आजार असलेल्यांची बालके तसेच कैद्यांची बालके यांना सहायक अनुदान प्रति बालक दरमहा 1100 रुपये लाभ मिळण्याची तरतुद आहे. सदर लाभ मिळण्याकरिता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अथवा जिल्हा बाल कल्याण समिती कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. मुव्हमेंट फॉर पीस अॅन्ड जस्टिस फॉर वेल्फेअर, लातूर (एम.पी.जे.) या संघटनेने सदर योजनेसाठी पात्र असलेले वंचित व गरजू बालकांचा शोध घेऊन लातूर जिल्हयातील 116 प्रस्ताव प्रशासनास सादर केलेले होते. सदर प्रस्तावांची प्रशासनाने पडताळणी करून 116 प्रस्तावांना मंजूरी दिली आहे. सदर बालकांना दरमहा 1100 रुपये लाभ मिळणार आहे. प्रशासनाच्या या सहकार्य बद्दल एम.पी.जे. द्वारा जिल्हा बाल कल्याण समिती व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे आभार मानुन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा सौ. उमा राजेश व्यास, सदस्या अॅड. सुजाता यशवंत माने, सदस्या अॅड.रजनी एस. गिरवलकर व सदस्य श्री उमाकांत पंडीतराव बिरादार तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती वर्षा पवार, डी.ए. कारभारी, आरविंद थोरात, व्हि.एन. देवकर, डि.व्ही. कांबळे, एस.ए. कांबळे, अमर लव्हारे, चिनगुंडे परमेश्वर, भगत अजयकुमार, श्रीमती इंगळे सिमा, श्रीमती कोकाटे सुषमा, श्रीमती रोहीणी कुलकर्णी व श्री गणेश यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी एम.पी.जे. चे पदाधिकारी रज़ाउल्लाह खान, साबेर काज़ी, ज़ियाभाई खोरीवाले, अॅड.रब्बानी बागवान, कमरोद्दीन बार्शीकर, शेख सलीमउल्लाह, अब्दुल समद, सय्यद फारूक हे उपस्थित होते. सदर योजने अंतर्गत वय 0 ते 18 वर्ष पर्यंतचे अनाथ बालके, एकपालक बालके, तीव्र मतिमंद बालके, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, कुटूंब वाद, कुष्ठरूग्ण व इतर गंभीर आजार असलेल्यांची बालके तसेच कैद्यांची बालके यांना लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करून प्रशासनास दाखल करण्याचे कार्य एम.पी.जे. द्वारा सुरू असून गरजूंनी एम.पी.जे. कार्यालय सनत नगर, एकबाल चौक, लातूर मो.क्र.9860506154 वर संपर्क साधावा. असे आवाहन एम.पी.जे. चे जिल्हा सचिव रज़ाउल्लाह खान यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.